• Sun. Jun 7th, 2026
    Pune Job Fraud: पुणे महापालिकेत बनावट भरती; युवकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा विजय कुंभार यांचा आरोप

    Pune Job Fraud: पैसे परत मागणाऱ्या उमेदवारांना नोकरी लागल्याचे किंवा सेवा नियमित झाल्याची बनावट कागदपत्रे देण्यात आली. काहींना दिलेले धनादेश बँकेत वटले नसल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

    पुणे क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महापालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने बेरोजगार युवकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या नावाने बनावट भरती प्रक्रिया राबवून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

    उमेदवारांकडून नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये उकळण्यात आले. एका विद्यार्थ्याकडून ४५ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले असून, शिवानंद पाटील, नमिता बनसोडे आणि राजेंद्र खेडेकर यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

    Maharashtra TimesPune MLC: विधान परिषदेच्या पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा; महायुतीत ‘हायव्होल्टेज’ राजकीय घडामोडी
    फसवणुकीसाठी नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब केला होता. बनावट नियुक्तीपत्रे, प्रशिक्षण आदेश, वर्कऑर्डर; तसेच पुणे महापालिकेचे बनावट शिक्के आणि लोगो वापरून भरती प्रक्रिया अधिकृत असल्याचे भासवण्यात आले.

    पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव वापरून उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यात आला. काही ठिकाणी पालिकेजवळील हॉटेलमध्ये मुलाखती आयोजित करून प्रक्रिया खरी असल्याचा आभास निर्माण केला. बनावट कर्मचारी दाखवून त्यांच्या नावाने खोट्या वेतन पावत्या तयार केल्याचेही समोर आले आहे.

    या रॅकेटमध्ये पालिकेतील काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण साखळी उघड करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

    Maharashtra TimesNEET Paper Leak : ‘नीट’ची प्रश्नपत्रिका पुण्यातूनच राजस्थानला, 150 प्रश्नांसाठी 10 लाखांचा सौदा, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञाचीही CBI चौकशी
    आयुक्तांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचे नियुक्तीपत्र
    महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी १५ लाख ४१ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार नाना पेठेतील एका तरुणाने केली आहे. या तिघांनी चक्क महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचे आणि शिक्क्यांचे नियुक्तीपत्र दिल्याचा आरोप तरुणाने केला आहे. या तरुणाने अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत पोलिस आयुक्त कार्यालयाकडे लेखी तक्रार दिली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा