• Sat. Jun 6th, 2026
    Bird Flu: नवापुरात बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री फार्मला फटका; कोट्यवधींचे नुकसान; लाखो कोंबड्यांचे कलिंग

    पंकज काकुळीद, धुळे : नवापूर शहरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. आतापर्यंत आठ पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात तिसऱ्यांदा बर्ड फ्लूने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणावर कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. आतापर्यंत पंधरा पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे कलिंग करण्यात आले, तसेच अंडी व पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या आठवड्यात केंद्रीय पशुसंवर्धन विभागाचे पथक नवापूर तालुक्यातील बर्ड फ्लू परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येणार आहेत.

    राज्यातील पोल्ट्री हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवापूर येथील डायमंड, डॉन व तसलीम या तीन पोल्ट्री फार्ममध्ये सर्वप्रथम रोगाचे नमुने पॉझिटिव्ह आले होते. ही लागण गुजरातच्या सीमारेषेवरून झाल्याची महिती समोर आल्याचे समजते, तर या पोल्ट्री फार्ममधील अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने भोपाळमध्ये अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.

    Solapur News: होय आम्ही झुरळ! CJPचा महाराष्ट्रात मोठा इफेक्ट, कोर्टाविरोधात युवक रस्त्यावर, पोलिसांना चकवलं, 4 मागण्यांचं निवेदन दिलं
    अहवाल प्राप्त झाल्यानंतर ३० एप्रिल रोजी पक्ष्यांचे कलिंग करण्यात आले. त्यानंतर पुन्हा ७ मे रोजी पालावाला पोल्ट्री फार्म , सकिस्मा पोल्ट्री फार्म व अश्रफ पोल्ट्री फार्म येथील पक्ष्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले होते, तर १३ मे रोजी नवापूर शहरालगत असलेल्या लहान चिंचपाडा परिसरातील रिची पोल्ट्री फार्म, तसेच न्यू शांती पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या दोन्ही नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. नवापुरात एकूण ३८ पोल्ट्री फार्म आहेत.

    नऊ कर्मचाऱ्यांचेही नमुने रवाना
    बाधित पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले असून, अंडी व पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोल्ट्री फार्ममध्ये कार्यरत असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाने बाधित परिसरात दैनंदिन सर्वेक्षणासाठी २७ पथके नियुक्त केली आहेत. या पथकांमध्ये दोन वैद्यकीय अधिकारी नोडल अधिकारी म्हणून कार्यरत असून, आठ सीएचओ (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर) चा समावेश आहे.

    Maharashtra TimesKolhapur News: वर्षभरापूर्वीच लग्न, पण इंजिनिअर तरुणाचा आता टोकाचा निर्णय; 33 व्या वर्षीच मृत्यूला कवटाळलं, कुटुंबाला धक्का
    आतापर्यंत नवापूर शहरासह तालुक्यातील आठ पोल्ट्री फार्मतील पक्ष्यांचे बर्ड फ्लूचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या अहवालानंतर शास्त्रीय पद्धतीने पक्ष्यांचे कलिंग करण्यात आले, तसेच अंडी व पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे. ९० दिवसांपर्यंत पोल्ट्री व्यवसाय बंद राहणार आहे.-डॉ. संजय खाचणे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग, नंदुरबार

    आर्थिक उलाढालदेखील ठप्प झाली आहे. मात्र, कामगारांना कामावरून न काढता त्यांना पगार दिला जात आहे. सरकारने प्रतिपक्षी ५०० रुपयांऐवजी १४० रुपयांप्रमाणे पंचनामा करून अन्याय केला आहे. अंडीही सहा रुपयांऐवजी चार रुपये सरकारकडून भरपाई दिली जाणार आहे. पंधरा दिवसांपासून पंचनामा करूनही अद्याप लाभ मिळालेला नाही. – आरिफभाई पालावाला, अध्यक्ष, नवापूर पोल्ट्री असोसिएशन

    नवापूर तालुक्यातील स्थिती
    ३८ —पोल्ट्री फार्म नवापुरात
    १५ —पोल्ट्री फार्मवर संकट
    ४,०६,६८२ —पक्ष्यांचे कलिंग
    २४,९१,६२३ —अंडी केली नष्ट
    ५,४८,९५८ —किलो खाद्य केले नष्ट

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed