• Sun. Jun 7th, 2026
    Child Death Cases: बालमृत्यू प्रकरणांत हलगर्जी भोवणार! ZPकडून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

    Nashik Child Death Case: डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या बालमृत्यूंच्या कारणांची सविस्तर कारणमीमांसा करण्यासाठी बुधवारी (दि.२०) जिल्हा परिषद सभागृहात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हा बालमृत्यू अन्वेषण समितीची’ बैठक झाली.

    बालमृत्यू प्रकरणांत हलगर्जी भोवणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: जिल्ह्यात डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या बालमृत्यूंच्या प्रकरणांमध्ये वैद्यकीय उपचार आणि प्रशासकीय स्तरावर दिरंगाई करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी दिले. आरोग्य सेवेतील हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

    यात क्षेत्रीय स्तरावरील गंभीर त्रुटी आणि रुग्णांना संदर्भित करण्यात झालेला विलंब समोर आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी नाराजी व्यक्त करत नोटिसा बजाविल्या.

    Maharashtra TimesNashik Crime: विवाहित महिलेचा तब्बल सातवेळा गर्भपात; नाशिकमधील ३३ वर्षीय तरुणीचा छळ, पतीसह सासू-सासऱ्यांना दणका
    सविस्तर चौकशी
    या सभेत दिंडोरी, पेठ, बागलाण, येवला, इगतपुरी आणि सुरगाणा या तालुक्यांमधील एकूण ६ बालमृत्यू प्रकरणांचे सविस्तर चौकशी करण्यात आली. या बैठकीला डॉ. सुधाकर मोरे, डॉ. हर्षल नेहेते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्यासह संबंधित तालुक्यांचे आरोग्य अधिकारी, आशासेविका, अंगणवाडी सेविका आणि मृत बालकांचे नातेवाईक उपस्थित होते.

    Maharashtra TimesAshok Kharat Case: ‘मनी लाँड्रिंग’चे परदेशात धागेदोरे? भोंदू अशोक खरात ईडीच्या कोठडीत; 70 कोटींचे व्यवहार रडारवर
    बालमृत्यू रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना

    -भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बैठकीत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या
    -गरोदरपणाच्या सातव्या महिन्यापासून दर आठवड्याला मातांचा पाठपुरावा करून त्यांना वेळेत संदर्भ सेवा पुरवाव्यात
    -आरोग्य व अंगणवाडी सेविकांनी गंभीर आजारी बालकांवर वेळेत प्राथमिक उपचार करून त्यांना उच्च उपचारांसाठी पाठवावे
    -आजाराची लक्षणे आढळल्यास ग्रामीण रुग्णालय किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवावे
    -बालकांचे नियमित वजन उंची घेऊन ‘सॅम’ व ‘मॅम’ बालकांना न्युट्रिशनल रिहॅबिलेशन सेंटर किंवा ‘व्हीसीडीसी’ मध्ये दाखल करावे
    -डॉक्टरांच्या सल्ल्याविरोधात बालकाला घरी घेऊन जाणाऱ्या पालकांचे आरोग्य विभागातर्फे योग्य समुपदेशन केले जावे
    -लसीकरण आणि गृहभेटीदरम्यान सर्व बालकांची परिपूर्ण तपासणी व्हावी

    बालमृत्यूंच्या घटना दुदैवी आहेत. यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे एकही जीव जाता कामा नये. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर यापुढे केवळ नोटीस नाही, तर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल. -प्रतिभा संगमनेरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा