Solapur Politics: सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये उमेदवारीवर जोरदार रस्सीखेच सुरू. रोहन देशमुख, राजन पाटील, राजेंद्र राऊत यांच्यासह अनेक नेते रेसमध्ये. भाजप मराठा कार्ड खेळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इरफान शेख, सोलापूर: विधान परिषदेच्या निवडणुकीच कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी बुधवारी जाहीर केला आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्याला एक जागा मिळण्याचे निश्चित मानले जात असून पक्षाच्या नव्या धोरणामुळे अनेक नवे चेहरे चर्चेत आले आहेत. भाजपकडून यावेळी विधानसभा किंवा लोकसभा न लढविलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा विचार सुरू आहे. मात्र तगड्या उमेदवाराना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भाजपकडून जातीय समतोल साधण्याचाही प्रयत्न केला जात आहे.सध्या सोलापूर जिल्ह्यातून काही प्रमुख नावांची चर्चा रंगली आहे. यामध्ये , प्रशांत परिचारक, राजन पाटील आणि प्राध्यापक शिवाजी सावंत, शहाजी पवार, रोहन देशमुख, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपच्या या नावांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजप मराठा कार्ड खेळणार की काय असे चित्र पाहावयास मिळत आहे.
भाजपच्या या उमेदवारांना प्राधान्य?
पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांचीही नावे चर्चेत आहेत. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि शिवसेनेच्या हालचाली लक्षात घेता भाजप त्यांचा वापर रणनीती म्हणून करू शकते. यापूर्वी चर्चेत असलेले राम सातपुते, रणजीत निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची नावे आता मागे पडल्या सारखे सध्या तरी चित्र दिसत आहे.
भाजप मराठा समाजाचा भक्कम चेहरा देण्याच्या तयारीत
सोलापूर जिल्ह्यातून रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेचे आमदार होते. ते मराठा समाजाचे असल्याने यावेळी मराठा समाजातील एक भक्कम चेहरा देण्यावरही भाजपचा विचार सुरू आहे. भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार राजन पाटील, हे सोलापूर जिल्ह्यातील मराठा चेहरे आहेत. मराठा पॅटर्न भाजपला जड जाऊ नये यासाठी भाजप मराठा कार्ड खेळणार का अशीची चर्चा राजकीय वर्तुळात वर्पातवली जात आहे.
भाजप नेत्यांची युवा चेहऱ्यावर नजर
भाजपचे युवा नेते रोहन देशमुख यांचे नाव पडद्यामागे वेगाने पुढे येत आहे . मराठा समाजाचे असल्याने त्यांचे पारडेही जड मानले जात आहे. यामागचं प्रॅक्टिकल कारण म्हणजे, लोकमंगल समूहाच्या सहकार नेटवर्कमुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मंगळवेढा भागातील अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे थेट संबंध आहेत. शिवाय, एक युवा चेहरा असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गटांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत, जे पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा