• Sat. Jun 6th, 2026
    Solapur News: होय आम्ही झुरळ! CJPचा महाराष्ट्रात मोठा इफेक्ट, कोर्टाविरोधात युवक रस्त्यावर, पोलिसांना चकवलं, 4 मागण्यांचं निवेदन दिलं

    इरफान शेख, सोलापूर: देशातील कोट्यावधी युवक-युवती शिक्षण, रोजगार, महागाई, कंत्राटीकरण, पेपरफुटी, खासगीकरण आणि असुरक्षित भविष्य अशा असंख्य संकटांशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून युवकांची तुलना “झुरळांशी” करण्यात येणे ही अत्यंत संतापजनक, अपमानास्पद आणि असंवेदनशील बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाने व्यक्त केली आहे.

    हा केवळ शब्दांचा प्रश्न नाही

    “देशातील तरुण पिढीच्या स्वाभिमानावर केलेला घाव आहे,” असे युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम यांनी सांगितले. युवक म्हणजे देशाची ऊर्जा, श्रम, बुद्धिमत्ता आणि भविष्य असून, कारखान्यात राबणारा कामगार युवक, शेतात घाम गाळणारा शेतकरी युवक, स्पर्धा परीक्षांसाठी आयुष्य झिजवणारा विद्यार्थी आणि बेरोजगारीशी झुंज देणारा पदवीधर हे “झुरळ” नसून भारताच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    युवा महासंघाने दिला इशारा

    देशातील लाखो युवक रोजगारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. अनेकांनी नैराश्यातून आत्महत्या केल्या आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी व्यवस्था युवकांच्या मूलभूत प्रश्नांवर मौन बाळगून आहे. अशा वेळी न्यायासनावरून येणारे अपमानकारक वक्तव्य युवकांच्या जखमेवर मीठ चोळणारे असल्याची टीका करण्यात आली. संविधानिक पदांवरील व्यक्तींनी संयम, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी जपली पाहिजे; अन्यथा जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होईल, असा इशाराही युवा महासंघाने दिला.

    Mumbai News: अंतरवालीत आंदोलनाची हाक, अन् मुंबईत सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजासाठी आनंदाची बातमी

    होय आम्ही झुरळ

    भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समितीच्या वतीने भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी युवकांविषयी केलेल्या कथित विधानाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी तरुणांनी “होय, आम्ही झुरळ!” असे उपरोधिक विधान असलेली जॅकेट परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी पाचारण केले. युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. निवेदनासोबत प्रतीकात्मक झुरळाची प्रतिमाही देण्यात आली.

    प्रमुख मागण्या

    1. संबंधित न्यायाधीशांनी देशातील युवकांची जाहीर माफी मागावी.

    2. सर्वोच्च न्यायालयाने या वक्तव्याबाबत अधिकृत स्पष्टीकरण द्यावे.

    3. युवकांविषयी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या घटनांची गंभीर दखल घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी.

    4. सरकारने युवकांच्या प्रश्नांवर तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून रोजगार, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेबाबत ठोस धोरण जाहीर करावे.

    यावेळी युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण, केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम, जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ, राज्य समिती सदस्य विजय हरसुरे, अश्विनी मामाड्याल, तसेच नरेश गुल्लापल्ली, अभिजित निकंबे, दिनेश बडगु, चंटी बिटला, राधागोपाल बंडी आदी उपस्थित होते.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed