• Wed. Sep 9th, 2026

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांचे मुंबईत आगमन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 20, 2026
सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांचे मुंबईत आगमन – महासंवाद

मुंबई, दि. २० : सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स व त्यांचे शिष्टमंडळ यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानाने सायं ५.०० वाजता आगमन झाले.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सायप्रस प्रजासत्ताकचे उच्चस्तरीय अधिकारी स्वागतासाठी उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलिस आयुक्त देवेन भारती, तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी आणि इ. मान्यवर उपस्थित होते.
सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी त्यांच्या शिष्टमंडळासमवेत, हॉटेल ताज महाल, पॅलेस, मुंबई येथे प्रयाण केले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed