• Mon. Jun 15th, 2026
    Nashik News : हमीभावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! आमदार रोहित पवार आक्रमक, कांदा दरावरुन लासलगावी आंदोलन; नेमक्या मागण्या काय?

    Nashik Lasalgaon Rohit Pawar Agitation : हिंदू असलेल्या शेतकऱ्यांसाठी मंत्री नितेश राणे यांनी आता समोर यावे. ते आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत? असा खोचक प्रश्न आमदार रोहित पवारांनी माध्यमांसमोर विचारला.

    रोहित पवार कांदा आंदोलन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, नाशिक : कांद्याच्या दरावरून लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निफाड येथे सोमवारी (दि. १८) ‘शेतकरी एल्गार’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी केले. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २४०० रुपयांपेक्षा अधिक दर आणि यापूर्वी विकलेल्या कांद्यावर अनुदान द्यावे, अन्यथा २६ मे रोजी चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्ग रोखून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा खरेदीसाठी १२३५ रुपये दर जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली होती. त्याच्या निषेधार्थ लासलगाव बाजार समिती परिसरात हे आंदोलन झाले. आमदार रोहित पवार यांनी स्वतः कांद्याने भरलेला ट्रॅक्टर चालवत बाजार समितीत प्रवेश केला. अनेक शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. काहींनी कमरेला केळीची पाने गुंडाळून निषेध व्यक्त केला.
    Maharashtra TimesWater Shortage: यंदा मान्सूनमध्ये नागरिकांवर जलसंकट! राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ३३.१६ टक्क्यांवर; ‘एल निनो’मुळे चिंता
    या आंदोलनात नगरचे खासदार नीलेश लंके, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, माजी आमदार सुनील भुसारा, जयदत्त होळकर, माणिकराव शिंदे, दत्तात्रय पाटील, शिवा सुराशे, ललित दरेकर, सोनिया होळकर, प्रवीण कदम, खंडू बोडके, विक्रम रंधवे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

    रोहित पवार यांनी सरकारवर टीका करीत सध्या निवडणुका नसल्याने सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची पर्वा नसल्याचा आरोप केला. २०२४ पूर्वी २४०० रुपये दराचे आश्वासन देणारे सरकार आता साडेबाराशे रुपये देत असल्याचे त्यांनी म्हटले. अवकाळी पाऊस, गारपीट आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राच्या निर्यात धोरणाअभावी कांद्याच्या बाजारपेठेवर परिणाम झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
    Maharashtra TimesMumbai News: मान्सूनसाठी ‘एमएमआरडीए’ सज्ज! मेट्रो मार्ग आणि रस्त्यांवर विविध पायाभूत सुविधा; कसा होणार फायदा?
    खासदार लंके यांनी कांदा उत्पादनाचा खर्च १८ रुपये किलो असताना सरकारचा दर अपुरा असल्याचे म्हटले. खासदार भगरे यांनी कांद्याला तीन हजार रुपये दर आणि विकलेल्या कांद्यावर १५०० रुपये अनुदान देण्याची मागणी केली. सरकारला सात दिवसांची मुदत देत मागण्या मान्य न झाल्यास २६ मे रोजी महामार्ग रोको आंदोलन करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

    पाशा पटेल यांच्यावर टीका

    नऊ महिन्यांपूर्वी रंगीबिरंगी कपडे आणि गॉगल घालणाऱ्या पाशा पटेल यांच्या नेतृत्वात कांद्यासाठी एक समिती नेमली. त्यांना कांद्यातले काही कळते का? अशी नियुक्ती करताना तुम्हाला माणसांचीच पारख नसेल, तर तुम्ही शेतकऱ्यांना कशी मदत करणार, अजून या समितीचा अहवाल आला नाही, अशी टीका आमदार पवार यांनी केली.
    Maharashtra TimesMaharashtra Politics : जागा राष्ट्रवादीची डोळा भाजपचा, पुण्यात महायुतीत रस्सीखेच; सुनेत्रा पवारांसमोर पेच, पार्थ यांचा निकटवर्तीयही शर्यतीत

    या आहेत मागण्या

    कांद्याला किमान 2400 ते 3000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा.

    शासनाने थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करावी.

    मागील अनुदानातील उर्वरित 150 रुपये प्रतिक्विंटल तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा