Maharashtra Politics : एका उद्यानात सुरू असलेले धार्मिक बांधकाम थांबवण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांना भर रस्त्यात अडवून जाब विचारला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : चिखली घरकुल परिसरातील एका उद्यानात सुरू असलेले धार्मिक बांधकाम थांबविण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांना भर रस्त्यात अडवून जाब विचारला. ‘विलास लांडे यांचा पराभव करण्यासाठी मी १५ वर्षे तुमचे काम करीत राहिले,’ असा पक्षविरोधी कामाचा जाहीर दाखला देऊन कदम यांनी आमदार लांडगेंना भाजप नगरसेविकेकडून उद्यानातील रोखण्यात आलेल्या बांधकामाबाबत जाब विचारला.
महापालिका ‘प्रभाग ११’मध्ये समाविष्ट असलेल्या एका उद्यानात सुरू असलेल्या धार्मिक बांधकामावरून भाजपच्या स्थानिक नगरसेविका योगिता नागरगोजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे.
धार्मिक स्थळाला तीव्र विरोध
चिखली-घरकुल परिसरात महापालिकेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाच्या परिसरात पाणथळ जागा, धावण्यासाठीचा मार्ग (जॉगिंग ट्रॅक) आणि जुनी-नवी मिळून घनदाट झाडी आहे. स्पाइन रस्ता आणि ‘प्रभाग १०’मधील संभाजीनगरच्या मध्यभागी हा परिसर येतो. या जागेवर पाच महिन्यांपासून माजी महापौर कदम यांच्या पुढाकाराने २५ गुंठे क्षेत्रावर धार्मिक स्थळ उभारण्याचे काम सुरू आहे. याला महेश लांडगे यांच्या समर्थक असलेल्या नगरसेविका नागरगोजे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. Tilak Varma Dating : तिलक वर्माला डेट करायला माझ्या श्रीलीलाकडे वेळ नाही, ती ‘नीट’ची तयारी करतेय, आईने अफवा उडवून लावल्या
कदम विरुद्ध नागरगोजे
गेल्या दोन दिवसांपासून कदम आणि नागरगोजे यांच्यातील हा वाद अत्यंत विकोपाला गेला आहे. शनिवारी नागरगोजे यांनी सुरू असलेल्या कामाला प्रत्यक्ष विरोध केला. त्यानंतर रविवारी कदम यांनी आपल्या समर्थकांसह आमदार लांडगेंना जाब विचारला. लांडगे एका कामगार मेळाव्यासाठी या भागातील सभागृहात आले होते. कार्यक्रम संपवून परतत असताना कदम यांनी त्यांना रस्त्यात रोखून तीव्र शब्दांत सुनावले.
Maharashtra Politics : जागा राष्ट्रवादीची डोळा भाजपचा, पुण्यात महायुतीत रस्सीखेच; सुनेत्रा पवारांसमोर पेच, पार्थ यांचा निकटवर्तीयही शर्यतीत
१५ वर्ष तुमच्या पाठीशी राहिले
आमदार महेश लांडगे यांना जाब विचारताना कदम अतिशय संतप्त झाल्या होत्या. ‘१५ वर्षे तुमचे काम करीत आहोत. तुम्हाला पूर्वकल्पना देऊन आणि विचारूनच हे काम सुरू केले. तुम्ही मला तसे पत्रही दिले होते. आता तुमची नगरसेविका सांगतेय, की महेशदादांनीच मला हे काम पाडायला सांगितले आहे. मी विलास लांडे यांचा पराभव करण्यासाठी १५ वर्षे तुमच्या पाठीशी उभी राहिले,’ असे कदम म्हणताच लांडगेही स्तब्ध झाले.
“मी ‘प्रभाग क्रमांक १०’चे नेतृत्व करते. या उद्यानात तरुण, ज्येष्ठ नागरिक व्यायामासाठी येतात. या ठिकाणी मंगला कदम यांच्या माध्यमातून अनधिकृतपणे धार्मिक स्थळाचे बांधकाम सुरू आहे. आमचा धार्मिक स्थळाला विरोध नाही. मात्र, हे उद्यान नागरिकांसाठी गरजेचे आहे. महापालिकेकडे या संदर्भात तक्रार केली असून, लवकरच यावर कारवाई होईल. कदम यांनी स्वतःच्या प्रभागाकडे लक्ष द्यावे. आमचा अपप्रचार करू नये.” – योगिता नागरगोजे, भाजप नगरसेविका
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा