• Sat. Jun 6th, 2026
    India’s First Bullet Train: फक्त 2 तासांत मुंबई ते अहमदाबाद, 320चा वेग, महाराष्ट्रात 4 थांबे; भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर

    Mumbai Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पुन्हा चर्चेत आला असून भारताच्या पहिल्या हाय-स्पीड ट्रेनचा प्रस्तावित लूक आणि फीचर्स समोर आले आहेत. 320 किमी वेग, विमानासारख्या सुविधा आणि अवघ्या 2 तास 7 मिनिटांत प्रवासामुळे या प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : देशातील बहुप्रतिक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर आणि विविध रिपोर्ट्समध्ये भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचे प्रस्तावित डिझाइन समोर आले असून, तिच्या वेगवान लूकपासून ते प्रीमियम सुविधांपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे. जपानच्या प्रसिद्ध शिंकान्सेन तंत्रज्ञानावर आधारित ही ट्रेन भविष्यात भारतीय रेल्वे प्रवासाचे चित्र बदलू शकते, असा दावा केला जात आहे.

    समोर आलेल्या डिझाइननुसार ट्रेनचा लूक अत्यंत एअरोडायनॅमिक ठेवण्यात आला आहे. हवेचा प्रतिकार कमी व्हावा आणि अतिवेगातही ट्रेन स्थिर राहावी, यासाठी पुढील भाग टोकदार स्वरूपात डिझाइन करण्यात आल्याचे दिसत आहे. ट्रेनमध्ये केशरी, पांढरा आणि गडद रंगसंगतीचा वापर करण्यात आला आहे.

    रिपोर्ट्सनुसार, भारतात सुरुवातीला जपानच्या E5 आणि E10 सिरीजमधील बुलेट ट्रेन धावू शकतात. त्यानंतर पुढील टप्प्यात भारतात विकसित होणाऱ्या B28 सिरीजच्या हाय-स्पीड ट्रेन रुळांवर आणण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पात बंगळुरूमधील BEML कंपनीची महत्त्वाची भूमिका असणार असल्याचे सांगितले जात आहे.

    Maharashtra TimesShivraj Motegaonkar: ‘तो’ डेटा डिलीट ते मॉक टेस्ट’; CBI कडून कोर्टात जोरदार युक्तिवाद, मोटेगावकरला 9 दिवसांची कोठडी

    320 किमी वेग, 1000 प्रवाशांची क्षमता

    भारताच्या बुलेट ट्रेनचा वेग ताशी 320 किलोमीटरपर्यंत असू शकतो. 8 डब्यांची ही ट्रेन सुमारे 200 मीटर लांबीची असेल आणि एका वेळी जवळपास 1000 प्रवाशांना घेऊन धावू शकेल. कमी आवाज आणि कंपनविरहित प्रवासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

    विमानासारख्या प्रीमियम सुविधा

    बुलेट ट्रेनमध्ये प्रवाशांना विमानप्रवासासारख्या सुविधा मिळू शकतात. रुंद आणि रिक्लायनिंग सीट्स, प्रत्येक सीटवर USB चार्जिंग पॉइंट, पॉवर सॉकेट, हाय-स्पीड वायफाय, मोठ्या खिडक्या आणि एलईडी लाईटिंग अशी सुविधा असण्याची शक्यता आहे. याशिवाय, जपानी शैलीतील स्मार्ट टॉयलेट्स, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, मोठे लगेज स्पेस आणि स्नॅक्स-चहा कॉफी सर्व्हिसची सुविधाही उपलब्ध असू शकते.

    मुंबई ते अहमदाबाद फक्त 2 तास 7 मिनिटांत?

    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर हा देशातील पहिला हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प ठरणार आहे. सुमारे 508 किलोमीटरच्या या मार्गावर नॉन-स्टॉप प्रवास अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, सूरत,वडोदरा, बिलिमोरा, आनंद, भरुच, साबरमती ते अहमदाबाद अशी 12 स्थानके या मार्गावर असणार आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा