भारतात गुरुला देव मानलं जातं. पण आता शिवराज मोटेगावकर सारख्या शिक्षकांकडून जे प्रकार समोर येत आहेत ते पाहिल्यानंतर गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासली जात आहे. विशेष म्हणजे अशा प्राध्यापकांमुळे शिक्षण विभागावर विश्वास ठेवायचा कसा? असा प्रश्न सर्वासामान्यांना पडत आहे. या प्रकरणी आता सीबीआयने शिवराज मोटेगावकरला बेड्या ठोकल्या आहेत. पण त्याला अटक नेमकी कशी केली? याबाबत माहिती समोर आली आहे. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक विद्यार्थिनी आरसीसीच्या मॉकटेस्टमधील प्रश्नच मुख्य नीट परीक्षेला आल्याचं सांगताना दिसत आहे.
प्रातिनिधिक फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरच्या आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केली आहे. त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. सीबआयने या प्रकरणी लातूरमधून प्रल्हाद कुलकर्णी या निवृत्त प्राध्यापकाला अटक केली होती. तसेच पुण्यातून प्राध्यापिका मनिषा मांढरे हिला अटक केली होती. यासोबत विविध राज्यातून वेगवेगळ्या आरोपींना अटक करण्यात आली होती. मोटेगावकर हा सीबीआयच्या रडारवर कसा आला? याचीदेखील माहिती आता समोर येत आहे.
शिवराज मोटेगावकर याने आपल्या क्लासच्या जाहिरातीसाठी नीट पेपरनंतर दोन विद्यार्थिनींचा मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला. याच व्हिडीओत मोटेगावकरचे बिंग फुटल्याचं बोललं जात आहे. कारण या व्हिडीओत एक विद्यार्थिनी आरसीसी क्लासच्या मॉकटेस्टमधील 101 प्रश्नांमधीलच प्रश्न परीक्षेत आल्याचं सांगत आहे. पण हाच व्हिडीओ केवळ मोटेगावकरला अटकेचं कारण नाही. तर सीबीआयला तपासातूनही माहिती मिळाली.
शिवराज मोटेगावकरच्या व्हिडीओत काय?
शिवराज मोटेगावर याने शेअर केलेल्या व्हिडीओत तो दोन विद्यार्थिनींसोबतचे संभाषण टाकले आहे. ते पुढीलप्रमाणे:
मोटेगावकर : नीट 2026 चा आताच पेपर झाला. माझ्यासोबत विद्यार्थी आहे. ती आताच पेपर देऊन आली. आरसीसीच्या मॉब टेस्टमधील प्रश्न आले? असा प्रश्न शिवराज मोटेगावकर विद्यार्थिनीला विचारतो. त्यावर ती, त्याबाहेरचे प्रश्न आलेच नाहीत, असं उत्तर देते. मोटेगावकर : तुम्ही आरसीसीवर खूश आहात? विद्यार्थिनी : हो मोटेगावकर : बायोलॉजी काय म्हणते? विद्यार्थिनी : सगळं मॉब टेस्टमध्ये विचारलं तेच आलं होतं. मोटेगावकर : आपलं मॉब टेस्ट सोपं होतं की अवघड होतं? विद्यार्थिनी : सोपं होतं. मोटेगावकर : वा छान मोटेगावकर : आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थिनी आहे. ताई कसा गेला प्रश्न? दुसरी विद्यार्थिनी : खूप छान सर. तुम्ही जे 101 प्रश्न दिले होते त्यातीलच सर्व प्रश्न आले. मोटेगावकर : अरे वा, शेवटी आपण मॉकला जे घेतो ते सगळे प्रश्न. व्हेरी गुड! आरसीसीचे मॉक पेपर मोर दॅन सफिशियन्ट? दुसरी विद्यार्थिनी : हो मोटेगावकर : व्हेरी गुड, खूप छान!
आणखी एक व्हिडीओ समोर
शिवराज मोटेगावकरच्या क्लासशी संबंधित आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत मोटेगावकर याच्या क्लासमध्ये चौकशीसाठी गेलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना कशाप्रकारे क्लासमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी आश्वासन दिलं जातं ते बघायला मिळालं आहे.
“आमच्या क्लासमध्ये शिकवलेलं, आमच्या स्टडी मटेरियलमधल्या गोष्टी, किंवा आमच्या टेस्ट सीरिजमधील प्रश्न नीटच्या परीक्षेत विचारले जातात याची खात्री आहे. आमच्या इथला रिझल्ट आहे तो भारतातला सर्वात जास्त रिझल्ट आहे. तु्म्ही पूर्ण भारतात एम्स किंवा शासकीय मेडिकल कॉलेज बघा, हे एकमेव कोचिंग क्लास आहे की, तिथे आरसीसीचा एक तरी विद्यार्थी नक्की सापडेल. आमच्या इतका निकाल इतर कोणत्याही कोचिंग क्लासचा नाही”, असा दावा क्लासमधील व्यक्त करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तसेच “आम्ही क्लासमध्ये शिकवलेलं, आमच्या स्टडी मटेरियलमधल्या गोष्टी किंवा आमच्या टेस्ट सीरिजमधील प्रश्न नीटच्या परीक्षेत विचारले जातात याची खात्री आहे”, असंही संबंधित व्यक्ती बोलताना दिसत आहे. दरम्यान, आम्ही या व्हिडीओची पुष्टी करत नाही. या प्रकरणी सीबीआयकडून सखोल तपास सुरु आहे.
मोटेगावकर सीबीआयला कसा सापडला?
प्रल्हाद कुलकर्णी आणि आणखी काही आरोपींच्या चौकशीतून शिवराज मोटेगावकर याचे नाव सीबीआयच्या चौकशीत समोर आलं. त्यानुसार सीबीआयने लातूरमध्ये जावून शिवराज मोटेगावकर याची सर्वसाधारण चौकशी करतात तशी चौकशी केली. तसेच त्याचा फोन फॉरेन्सिक तपासासाठी घेतला. यानंतर त्याला फोन परत घेण्यासाठी पुण्याला बोलावलं. तिथे सीबीआयने त्याला अटक केली, अशी माहिती समोर आली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा