• Mon. Jun 15th, 2026

    NEET Paper Leak Case: मोटेगावकर-RCC क्लासेस व्हाया मनीषा वाघमारे, विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचला पेपर? रॅकेटची टाइमलाइन समोर

    NEET Paper Leak Case: मोटेगावकर-RCC क्लासेस व्हाया मनीषा वाघमारे, विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचला पेपर? रॅकेटची टाइमलाइन समोर

    NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात RCC क्लासेसचा शिवराज मोटेगावकर, मनीषा वाघमारे आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या प्रश्नपत्रिकेची धक्कादायक टाइमलाइन समोर आली आहे. CBI तपासात 23 एप्रिलपासून सुरू झालेल्या रॅकेटबाबत मोठे खुलासे झाले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    लातूर: NEET पेपरफुटी प्रकरणात आता प्रश्नपत्रिका नेमकी कधी आणि कुणाकडे पोहोचली होती, याची धक्कादायक टाइमलाइन समोर येत आहे. CBI तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, लातूरमधील RCC क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्याकडे परीक्षेच्या तब्बल दहा दिवस आधी म्हणजे 23 एप्रिललाच प्रश्नपत्रिका पोहोचली होती. त्यानंतर 27 एप्रिलपर्यंत हा पेपर इतर आरोपी आणि काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

    या प्रकरणात CBIने अटक केलेल्या शिवराज मोटेगावकरला दिल्लीतील विशेष CBI न्यायालयाने 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. पेपरफोडी रॅकेटमधील त्याची भूमिका, आर्थिक व्यवहार आणि इतर आरोपींशी असलेले संबंध याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

    तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 3 मे रोजी होणाऱ्या NEET परीक्षेची केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका मोटेगावकर याच्याकडे 23 एप्रिललाच आली होती. त्यांच्या मोबाईलमध्ये संबंधित प्रश्नपत्रिका आणि उत्तरांची माहिती आढळून आल्याचा दावा CBIने न्यायालयात केला आहे. तपास सुरू झाल्यानंतर मोबाईलमधील काही डेटा डिलीट करण्यात आल्याचेही समोर आले. मात्र, फॉरेन्सिक तपासातून हा डेटा पुन्हा मिळवण्यात तपास यंत्रणांना यश आल्याची माहिती आहे.

    Maharashtra TimesIndia’s First Bullet Train: फक्त 2 तासांत मुंबई ते अहमदाबाद, 320चा वेग, महाराष्ट्रात 4 थांबे; भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर

    वितरण कसे झाले?

    दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची आरोपी मनीषा वाघमारे हिचा सहभागही तपासात समोर आला आहे. CBIच्या माहितीनुसार, 27 एप्रिलपर्यंत काही निवडक विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नोत्तरं पोहोचली होती. मनीषा वाघमारे हिने तिचा जुना मित्र धनंजय लोखंडे याच्या माध्यमातून शुभम खैरनार याच्याशी संपर्क साधला होता. या तिघांच्या माध्यमातून प्रश्नोत्तरं पुढे वितरित करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

    डेटा रिकव्हर करण्यावर भर

    CBIने 13 मे रोजी मनीषा वाघमारेच्या घरावर छापा टाकून दोन मोबाईल फोन जप्त केले होते. जवळपास 24 तास सुरू असलेल्या या कारवाईत काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे डिलीट करण्यात आल्याचे समोर आले. सध्या CBI मोबाईल डेटा रिकव्हर करण्यावर भर देत असून, प्रश्नपत्रिका नेमक्या किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली याचा तपास सुरू आहे.

    CBI तपासाला वेग

    दरम्यान, लातूर, पुणे, नाशिक आणि इतर शहरांमधील कोचिंग नेटवर्क, दलाल आणि आर्थिक व्यवहारांचा तपासही वेगाने सुरू आहे. या संपूर्ण रॅकेटचे जाळे किती मोठे आहे आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध CBI घेत आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणामुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा