• Sat. Jun 13th, 2026
    Shivraj Motegaonkar : NEET पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात, मोठे खुलासे होणार

    RCC Coaching Class Director Shivraj Motegaonkar CBI Custody : नीट पेपरफुटी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील लातूरचे RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे.

    आरसीसी कोचिंग क्लास संचालक शिवराज मोटेगावकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    लातूर : संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लातूरमधील नामांकित RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावर यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. लातूर आणि पुण्यातल्या चौकशीनंतर मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात आले आहेत. मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्यानंतर आता या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात आणि वैद्यकीय प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

    तब्बल 8 ते 9 तास चौकशी

    लातूर हे वैद्यकीय शिक्षणाच्या तयारीसाठी ‘लातूर पॅटर्न’ म्हणून संपूर्ण देशात सर्वश्रुत आहे. याच लातूरमधील पेपरफुटीच्या कनेक्शनचा शोध घेण्यासाठी सीबीआयचे तब्बल 28 अधिकाऱ्यांचं पथक दाखल झालं होतं. या पथकानं शिवराज मोटेगावकर यांची तब्बल 8 ते 10 तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान पाहिजे तसं उत्तरं न मिळाल्यानं आणि संशयास्पद बाबी आढळल्यानं अखेर सीबीआयनं त्यांना ताब्यात घेतलं आहे.
    Maharashtra TimesNanded Crime : नीटची तयारी करताना विद्यार्थिनीला 120 गुण, पुण्यात सराव परीक्षेवेळी 560 मार्क्स, NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडमध्ये; कुटुंबाची 8 तास चौकशी

    पी.व्ही कुलकर्णींमुळे मोटेगावकरांपर्यंत पोहोचले

    मोटेगावकर यांचं नाव सीबीआयच्या रडारवर कसं आलं? याचाही एक मोठा खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून लातूरमधीलच पी. व्ही. कुलकर्णी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. कुलकर्णी यांच्या कसून केलेल्या चौकशीतूनच शिवराज मोटेगावकर यांचं नाव समोर आलं होतं. त्यानुसार सीबीआयनं चक्रं फिरवली अन् त्यांची चौकशी केली. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.
    Maharashtra TimesNEET Paper Leak : पुण्यातील महिलेची मदत, विद्यार्थ्यांचे सिक्रेट क्लास; नीट पेपरफुटीतील लातूरच्या प्राध्यापकाची A टू Z स्टोरी

    NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडमध्ये

    देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नांदेडपर्यंत येऊन पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBIच्या एका विशेष पथकाने शनिवारी नांदेडमध्ये धडक कारवाई केली. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विद्युतनगर भागातील एका संशयित कुटुंबाच्या घरावर छापा टाकत सीबीआयने तब्बल 7 ते 8 तास कसून चौकशी केली. धक्कादायक म्हणजे सदर कुटुंबीय आपल्या मुलीसाठी लाखो रुपयात नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय आहे. याच संशयावरुन सीबीआयच्या पथकाने छापा टाकून झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, या कारवाईमुळे नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा