• Fri. Jun 5th, 2026

    Vidhan Parishad Election: महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी

    Vidhan Parishad Election: महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी

    MLC Election Date: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्याचं राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा केली.

    महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सर्व १६ जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील असून या जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत २५ मे ते १ जून असणार आहे, तर अर्जांची छानणी २ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने या मतदारांतून होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकाही लांबल्या होत्या. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्याने विधानपरिषदेच्या या १६ जागांसाठीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

    कोणकोणत्या मतदारसंघांसाठी होणार निवडणूक?

    सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना

    दहा विधानपरिषद सदस्यांना शपथ

    काही दिवसांपूर्वीच विधानसभा सदस्यांच्या मतदानावर होणाऱ्या विधानपरिषदेच्या ९ जागांवरील निवडणूक पार पडली. विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक अशा दहा सदस्यांचा शपथविधी गुरुवारी सकाळी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडला. परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या सदस्यांना शपथ दिली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित होते.

    बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांमध्ये भाजपचे प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, शिवसेना उबाठा पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकींचा समावेश आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेतली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सातव यांनाच ती जागा देण्यात आली.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा