Mumbai Tree Fall: रिक्षातून प्रवास करताना झाड कोसळल्याने रिक्षात बसलेल्या दोन मुली जखमी झाल्या. यातील एका मुलीचा मृत्यू झाला आहे.
एका खासगी विकासाच्या कंपाऊंडमधून हे झाड कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यावेळी रिक्षातून प्रवास करणाऱ्या आरिका श्रीवास्तव आणि हर्षिता कुमार या दोघी गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांच्या मदतीने आणि रिक्षाचालकाच्या तत्परतेने दोघींना तातडीने खार येथील पी. डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Bike Taxi: आता रॅपिडो, ओला, उबरची बाईक सेवा बंद होणार? राज्य सरकारचा 24 तासांत मोठा निर्णय
दोघींनाही डोक्याला गंभीर दुखापती झाल्या होत्या आणि कवटीला फ्रॅक्चर झाले होते. रुग्णालयात आणण्यात आले, तेव्हा त्या बेशुद्ध होत्या. आपत्कालीन विभागातील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करत विविध शस्त्रक्रिया केल्या. मात्र उपचार सुरू असतानाच आरिका हिचा मृत्यू झाला. हर्षितावर अद्याप अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर पालिका प्रशासनावर आणि संबंधित मुंबई महापालिकेच्या बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा हेतल गाला यांनी संबंधित विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे समजते.
Vidhan Parishad Election: महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी
तर दुसऱ्या एका घटनेत, दारू पिऊन भरधाव कार चालवणाऱ्या चालकाने खडकवासला परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच वाहनांना धडक दिली. यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आणि त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले. नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खडकवासला भाजी मंडईजवळ हा अपघात झाला. यशराज नीलेश कांबळे असे मृत मुलाचे नाव आहे. त्याचे वडील नीलेश कांबळे आणि आई जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
