राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास आपण तयार असल्याचं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अहिल्यानगर : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकारने 29 मे पर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. अन्यथा 30 मे पासून आमरण उपोषण करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने याबाबत मागणी करत आहेत. मनोज जरांगे आपल्या या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे देखील बघायला मिळाले आहेत. जरांगे यांनी या मुद्द्यावरुन मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका देखील केली आहे. या सर्व घडामोडींनंतर आता राधाकृ्ष्ण विखे पाटील यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता मनोज जरांगे काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “मी पदाला चिकटून बसणाऱ्यांपैकी नाही. उपसमितीच्या अध्यक्षपदाचा माझा राजीनामा दिल्याने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होत असेल, तर मी राजीनामा द्यायलाही तयार आहे”, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.
अडीच लाख दाखले दिल्याचा विखे पाटलांचा दावा
“स्थानिक पातळीवर येणाऱ्या समस्या संबंधित आमदारांनी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मी मराठा आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष झाल्यानंतर हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली”, असा दावा विखे पाटील यांनी केला. आतापर्यंत तब्बल अडीच लाख दाखले वितरित करण्यात आले आहेत, असादेखील दावा विखे पाटील यांनी यावेळी केला.”राज्यातील सर्व आमदारांना स्थानिक अडचणी सोडवण्यासाठी पत्र पाठवल आहे. स्थानिक पातळीवर येणाऱ्या समस्या संबंधित आमदारांनी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने सातत्याने काम करत आहोत”, असंही विखे पाटील यावेळी म्हणाले.
सरकार कमी पडलेलं नसल्याचं स्पष्टीकरण
“सातारा गॅजेटची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही हे आम्ही मान्य करतो. मात्र त्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे. पुणे विभागीय आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाला आहे. केवळ अंतिम अंमलबजावणी बाकी आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनांबाबत सरकार कुठेही कमी पडलेलं नाही. आजपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही”, असं स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिलं. Avinash Adik : ‘हे हास्यास्पद, याने तटकरे-पटेल अन् पक्षाची मोठी हानी, कायदेशीर कारवाई करणार’, राष्ट्रवादीचा इशारा “आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने सातत्याने काम करत आहोत. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांनाही सरकार मदतीचा हात देत आहे. एसटी महामंडळात नोकरी देण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधितांनी ती स्वीकारली नाही. आता महावितरण आणि एमआयडीसीमध्ये त्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत”, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.
‘गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करणार’
“समितीच्या अध्यक्षपदाचा मुद्दा मी प्रतिष्ठेचा करणार नाही. मी मनोज जरांगे पाटील यांची लवकरच भेट घेणार आहे. आतापर्यंत झालेल्या कामाची सविस्तर माहिती त्यांना देणार आहे. काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत”, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा