• Sun. Jun 14th, 2026
    Avinash Adik : ‘हे हास्यास्पद, याने तटकरे-पटेल अन् पक्षाची मोठी हानी, कायदेशीर कारवाई करणार’, राष्ट्रवादीचा इशारा

    प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना दिल्लीच्या पक्ष कार्यालयात बंदी घालण्यात आल्याचं वृत्त हे हास्यास्पद असल्याची भूमिका पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी मांडली आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घडामोडींनी आता राज्यातील सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सातत्याने नवनवीन चर्चा समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पक्ष संघटनेतील पदाचा उल्लेख नव्हता. या मुद्द्यावरुन राजकारण तापल्यानंतर ही एक कारकून चूक असल्याचं सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं होतं. याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांना दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रवेशबंदी करण्यात आल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. काही माध्यमांनी याबाबतचे वृत्तदेखील प्रसारित केले होते. पण संबंधित वृत्त प्रकाशित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत पत्रकार परिषद पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाच्या दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रवेशबंदीच्या वृत्ताचं खंडन केलं. तसेच हे वृत्त प्रकाशित करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

    उमेश पाटील काय म्हणाले?

    “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आपल्याशी संवाद साधत आहोत. सर्वप्रथम एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या दिल्लीतील पक्ष कार्यालया संदर्भात जी काही घटना घडली त्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत”, असं उमेश पाटील म्हणाले. यानंतर अविनाश आदिक यांनी भूमिका मांडली.

    राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक काय म्हणाले?

    “मी काल दिल्लीच्या आमच्या पक्ष कार्यालयाला भेट द्यायला गेलो होतो. त्याबाबतीत एक बातमी एका वृत्तपत्रात आली. त्याच्या विश्लेषणासाठी मी आज पत्रकार परिषदेत आलो आहे. आपल्यापैकी काहींना कल्पना असेल, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यावेळच्या देखील राष्ट्रीय कार्यकारिणीत मी सरचिटणीस होतो. माझ्याकडे अजित पवार आणि खासदार प्रफु्ल्ल पटेल यांनी विशेष जबाबदारी ही दिल्लीच्या कार्यालयाची दिली होती. मी नियमीत कधी आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस दिल्लीत मुक्कामी असायचो आणि पक्ष कार्यालयाशी संबंधित जी काही कामे असतील, कार्यालयात येणारे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मी संपर्कात होतो”, असं अविनाश आदिक म्हणाले.

    “मधल्या काळात आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या, आणि अजित दादा यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं. या सगळ्या कालखंडात ऑक्टोबर ते कालपर्यंत मी पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयाला भेट दिलेली नव्हती. आता नव्याने झालेल्या कार्यकारिणीत माझा कागदी उल्लेख हा राष्ट्रीय सचिव असा असला तरी काही दिवसांत त्यामध्ये बदल जाणवेल. माझी नियुक्ती राष्ट्रीय महासचिव किंवा सरचिटणीस म्हणूनच झालेली आहे. माझ्यावर पुन्हा जुनीच जबाबदारी आहे. दिल्लीच्या कार्यालयाची जबाबदारी आहे. त्याचा भाग म्हणून मी काल दिल्लीच्या कार्यालयात गेलो”, अशी माहिती अविनाश आदिक यांनी दिली.

    ‘हे हास्यास्पद’, आदिक यांची प्रतिक्रिया

    “दिल्लीच्या कार्यालयात गेल्यानंतर जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते त्यांना मी भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. संपूर्ण दिवस मी तिथे घालवला. ते सगळं करुन मी संध्याकाळी परत येत असताना मला दिल्लीतील एका पत्रकार मित्राचा फोन आला. त्यांनी मला हास्यास्पद प्रश्न विचारला. त्यांनी मला असा प्रश्न विचारला की, त्यांना माहिती मिळाली की, मी दिल्लीतील पक्ष कार्यालयात बैठक घेतली, त्या बैठकीत असा निर्णय घोषित केला की, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना आपण कार्यालयात बंदी घालत आहोत. हे हास्यास्पद आहे”, अशी भूमिका अविनाश आदिक यांनी मांडली.

    “तुम्ही कुठलीही यादी काढून पाहा ते पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. आज नाही तर अनेक वर्षांपासूनचे आहेत. ते मला सिनियर आहेत हे सांगायची गरज नाही. वयाने, मानाने, पदाने, सर्वार्थाने सिनियर आहेत. त्यामुळे कुणीतरी खोचक पद्धतीने ही बातमी लीक केली आणि पत्रकार मित्रांना सांगितली. त्यांनी मला प्रश्न विचारला तेव्हा मी त्यांना सांगितलं की, ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या बाबतीत कार्यकारिणीत एकाचा राज्यसभेचे नेते म्हणून तर एकाचा लोकसभेचे नेते म्हणून असा उल्लेख झालेला आहे. अजून पुढे काय होईल ते माहिती नाही. पण पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत”, असं अविनाश आदिक म्हणाले.

    ‘या बातमीने पक्षाची हानी’, आदिक यांचा कारवाईचा इशारा

    “पूर्वीची परंपरा अशी होती की, दिल्लीच्या कार्यालयात जागा मर्यादीत असल्यामुळे अध्यक्षांचे जे चेंबर असतं त्याच चेंबरमध्ये प्रफुल्ल पटेल बसायचे. त्याच चेंबरमध्ये सुनील तटकरे आले तर बसायचे. पुढेही आता सुनेत्रा पवार अध्यक्षा आहेत. पण प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे कार्यालयात आले तरी त्यांचे बसण्याचे ठिकाण तेच असणार आहे. त्यांना वेगळं असं दालन कधीच नव्हतं. तशी गरज कधीच नव्हती. सर्वोच्च नेत्यांचं दालन एकच होतं. आताही तेच आहे हेच मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी इकडून-तिकडून माहितीच्या आधारे बातमी बनवली. या बातमीमुळे पक्षाच्या या दोन ज्येष्ठ नेत्यांची, पक्षाची हानी झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा करता येतो का? याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. मी सोमवारी याबाबत निर्णय घेणार आहे”, असा इशारा अविनाश आदिक यांनी दिला.

    “आजकाल बातम्या सुरु झाल्या की थांबवू शकत नाहीत. आमच्या काही हितशत्रूंनी या बातम्यांचं भांडवल करुन आग लावलायला सुरुवात केली. अशा गोष्टींमुळे कुठेतरी आळा बसावा यासाठी मी पत्रकार परिषद घेतली”, असं अविनाश आदिक यांनी स्पष्ट केलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा