Pune NEET Paper Leak Manisha Mandhare : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून अजून एका संशयित महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. सीबीआयने कसून तपासाला सुरुवात केली आहे.
जीवशास्त्र महिला प्राध्यापक मनिषा मांढरे सीबीआयच्या ताब्यात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपर फुटीप्रकरणात सीबीआयच्या कारवाईला वेग आला असून नाशिक, पुणे या शहरांमधून अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील पुण्यातील मनिषा वाघमारे या संशयित महिला आरोपीला तीन दिवसांपूर्वी रात्री उशिरा सीबीआयने ताब्यात घेतलं. त्यानंतर पुन्हा एका महिला प्राध्यापकाला पुण्यातून सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. तिचं नाव मनिषा मांढरे असून ती जीवाशास्त्राची प्राध्यापक असल्याचं समोर आलं आहे. तसेच या महिला प्राध्यापकाचा NTAशी देखील संबंधं असल्याचं सांगण्यात येत आहे.
मनिषा मांढरे ताब्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी एका महिला संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. ही महिला पुण्यात जीवशास्त्राची प्राध्यापक असल्याचं समोर आलं असून तिचा थेट संबंध NTAशी असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. मनिषा मांढरे असं या संशयित महिला आरोपीचं नाव आहे. या संपूर्ण प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 9 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे हे प्रकरण नाशिक, अहिल्यानगर, पुणे, लातूर आणि पुन्हा पुणे असं समोर आलं आहे. Drum Murder Case : 24 वर्षीय प्रियकराचा खून, विवाहित नर्सचं पतीच्या साथीने कृत्य, बॉडी निळ्या ड्रममध्ये सापडली, महिन्याभराने फिल्मी स्टाईल उलगडा दरम्यान, मनिषा वाघमारेला अटक केली त्यानंतर पुण्यातील बिबेवाडीतील तिच्या घरात कसून चौकशी करण्यात आली. 46 वर्षीय मनिषा ही पुण्यातील बिबडेवाडी परिसरात राहत असून तिनेच विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचविण्याचं काम केल्याचा संशय आहे. विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम मनीषाच करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिच्याकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. धनंजय लोखंडे आणि मनिषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेजेसही पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, मनीषा वाघमारे हिची कसून चौकशी करण्यात आली आहे. Nashik News : पुण्याहून नाशिकला लग्नाला, आईचं दूध प्यायल्यानंतर चिमुकलीची हालचाल थांबली; चार महिन्याच्या लेकीच्या मृत्यूचं खरं कारण समोर
21 जूनला नीटची फेरपरीक्षा
पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली नीटच्या फेरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. एनटीएकडून 21 जूनला नीट फेरपरीक्षा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. वर्षभर तयारी करुन परीक्षा दिल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. मात्र, आता लगेचच 21 जूनला नीट पुर्नपरीक्षा होणार असल्यानं विद्यार्थ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा