Pune Hadapsar Hospital Bomb : आरोपीने अवघ्या ४०० रुपयांत बनावट बॉम्ब तयार केला असून त्यासाठी ऑनलाइन १६० रुपयांचे डिजिटल घड्याळ घेतले होते. त्यासोबत पीव्हीसी पाइप, वायर आणि चिकट टेपचाही वापर करण्यात आला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : हडपसरमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बॉम्ब ठेवून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला नागपूर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. ऑनलाइन व्यवहार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. शिवाजी राठोड (२९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा सोलापूरचा असून, पुण्यात मांजरी परिसरात वास्तव्यास होता. दरम्यान, आजारपणाचा खर्च भागविण्यासाठी रुग्णालय चालकाकडून पैसे उकळण्याच्या हेतूने आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दाढी करुन कपडे बदलले
हडपसर येथील उषाकिरण रुग्णालयात बुधवारी बॉम्ब आढळून आला. पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाने हा बॉम्ब निकामी केला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, आरोपीने सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात बॉम्ब ठेवला. त्यानंतर त्याने घरी जाऊन जवळच्या सलूनमध्ये दाढी केली. कपडे बदलून तो पुन्हा घटनास्थळी परतला. त्यावेळी रुग्णालय परिसरात पोलिसांची हालचाल सुरू झाल्याचे त्याच्या लक्षात आले.
चिकट टेपच्या ऑनलाईन खरेदीने अडकला
आरोपीने अवघ्या ४०० रुपयांत बनावट बॉम्ब तयार केला. ऑनलाइन १६० रुपयांचे डिजिटल घड्याळ घेतले होते. त्यासोबत पीव्हीसी पाइप, वायर आणि चिकट टेपचा वापर करण्यात आला होता. हा बॉम्ब रुग्णालयात ठेवण्यासाठी आरोपीने एका दुकानात १५ रुपयांचे ऑनलाइन पेमेंट करून चिकट टेप खरेदी केली होती. ही गोष्ट सीसीटीव्हीत दिसून आली होती. यातून पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. ऑनलाइन पेमेंटशी संबंधित मोबाइल क्रमांकाच्या आधारे तपास पुढे सरकला. Nashik Crime : हॉटेल मॅनेजमेंटसह MBA झालं, आता विधीशिक्षण घ्यायचंय; कापडणीस पिता पुत्र मृत्यू प्रकरण, राहुल जगताप साडेचार वर्षांनी जेलबाहेर दहशतवादविरोधी पथक व पोलिस त्याच्या मांजरीतील घरी पोहोचले. त्यावेळी आरोपी पुणे रेल्वे स्थानकात पोहोचला होता. त्याने एका दुकानदाराच्या मोबाइलवर ऑनलाइन तीन हजार रुपये पाठवून स्वत:कडे रोख रक्कम घेतली. पोलिसांनी या व्यवहाराचाही तपासात उपयोग केला. तपासादरम्यान आरोपीने कोलकाता येथील हावडा रेल्वे स्थानकाचे तिकीट काढल्याचे निष्पन्न झाले. तो नेपाळमध्ये राहणाऱ्या बहिणीकडे जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली.
Solapur | पेट्रोल दरवाढ झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया,सरकारचा एकच धर्म; निवडणुका आणि सत्ता
‘बॉम्ब’च्या परीक्षेत ‘बीडीडीएस’ फेल
हडपसरमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आढळलेल्या कथित बॉम्बप्रकरणी बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने (बीडीडीएस) सुरुवातीच्या अहवालात संशयित वस्तूमध्ये तीन जिलेटीन कांड्या असल्याचा उल्लेख केला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत त्या वस्तूमध्ये कोणत्याही प्रकारच्या जिलेटीन कांड्या किंवा स्फोटक साहित्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ‘बीडीडीएस’ला संशयित वस्तूचे अचूक विश्लेषण करता आले नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘एटीएस’ला माहितीच नाही
या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे, मानक कार्यपद्धतीनुसार (एसओपी) अशा घटनांची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) देणे अपेक्षित असताना पुणे पोलिसांनी ती दिली नसल्याचे समोर आले आहे. माध्यमांमध्ये बातमी झळकल्यानंतर ‘एटीएस’ला या घटनेची माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. ‘एटीएस’चे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ‘बीडीडीएस’ने वस्तू निकामी केली होती. Dhule Crime : बायकोसमोर अपमान केल्याचा राग, मुलाने जन्मदात्या आई-वडिलांचा जीव घेतला, लेकीच्या लग्नाचा आनंद विरला ‘एटीएस’कडे बॉम्बमधील स्फोटकांचे स्वरूप आणि त्यातील रासायनिक घटक तपासण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असतात. मात्र, त्यांची मदत न घेता पुणे पोलिसांनी घाईत कारवाई केल्याची चर्चा आता पोलिस दलातही सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे ‘एसओपी’चे कथित उल्लंघन यावरून प्रशासनावर टीका होत आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा