Navi Mumbai News : नवी मुंबईतील स्थानकांचा तिढा कायम; ‘सिडको’कडून मध्य रेल्वेकडे ताबा देणार, रेल्वे प्रवाशांची गैरसोय कायम राहणार
नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या देखभाल, दुरुस्ती आणि प्रवासी सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या सिडको-मध्य रेल्वे समन्वयाचा तिढा कायम आहे. सिडकोच्या अखत्यारितील सर्व स्थानकांची देखभाल मध्य रेल्वेने करावी, असे स्पष्ट केले असून सिडकोकडे असलेल्या उत्पन्नाच्या हक्कासह संपूर्ण स्थानक आणि परिसराचा ताबा द्यावा, अशी भूमिका मध्य रेल्वेने घेतली आहे. यामुळे नवी मुंबईतील रेल्वे प्रवासी सुविधांची गैरसोय कायम राहणार आहे.
