Nashik Crime: एका ऑनलाइन कंपनीच्या पार्सलमधून मोबाइल चोरी करणाऱ्या संशयिताला ओझर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून साडेअठरा लाखांचे १३ महागडे मोबाइल फोन जप्त केले.
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला संशयित अभिषेक लोकेश सिन्हा (रा. ओझर, ता. निफाड) हा एका ब्रँडेड वस्तू ऑनलाइन विकणाऱ्या कंपनीमध्ये काम करीत होता. संशयिताचे इतर साथीदार आहेत का, तसेच आणखी मोबाइल चोरीचे प्रकार त्याने केले आहेत का, याचा सध्या पोलिस सखोल तपास करीत आहेत.
MSRTC Employees Suspended: प्रसिद्धीसाठी रील बनवण्याचा नाद अंगलट; पनवेल आगारातील ‘रिल स्टार’ महिला कर्मचाऱ्यासह तिघे निलंबित
संशयित बनावट पत्त्यांवर महागडे मोबाइल ऑर्डर करायचा. यानंतर ते पार्सल आल्यानंतर त्यातील मोबाइल काढून संबंधित ऑर्डर रद्द करायचा. त्याने सफाईदारपणे ही पद्धत अवलंबल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी ओझर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान संशयिताने चोरी करून विक्री केलेले विविध कंपन्यांचे एकूण १३ मोबाइल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नागपूर, नाशिक, पुणे आणि ओझर येथून जप्त करण्यात आले.
Abhijeet Dipke CJP Meeting: सीजेपी आंदोलनाची दिशा आज ठरणार; अभिजित दीपके यांच्या घरी कोअर कमिटीची बैठक
ट्रकची दुचाकीला धडक;
महिला ठार, पती जखमी
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर जिंदाल फाटा शिवारात भरधाव मालवाहू ट्रकने (एमएच १४, बीजे ४५६७) दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर झाले. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात ट्रकचालक बाबासाहेब कदम (रा. मिरज, जि. सांगली) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनंदा काशिनाथ शिरसाठ ( वय ५९ ) असे मृत महिलेचे नाव आहे. फिर्यादी काशिनाथ शिरसाठ हे पत्नी सुनंदा यांच्यासह दुचाकीवरून नाशिककडे जात होते. त्यावेळी मागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
