• Sun. Jun 7th, 2026

    Thane Crime: विवाहित महिलेनं प्रियकराला भेटायला बोलावलं, नंतर जीव घेऊन थेट ड्रममध्ये भरलं; ठाण्याजवळ धक्कादायक घटना

    Thane Crime: विवाहित महिलेनं प्रियकराला भेटायला बोलावलं, नंतर जीव घेऊन थेट ड्रममध्ये भरलं; ठाण्याजवळ धक्कादायक घटना

    Mumbra Murder Case: सुरुवातीला महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसानंतर नंतर विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.

    बेपत्ता तरुणाच्या हत्येचा उलगडा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: मागील काही दिवसापासून बेपत्ता असलेल्या मुंब्रा येथील एका तरुणाची कट रचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हत्येनंतर या तरुणाचा मृतदेह ड्रममध्ये भरून ड्रम वसईत निर्जन स्थळी फेकून देण्यात आला होता. मृतदेह ताब्यात घेत, या हत्येप्रकरणी एका महिलेसह तिच्या भावाला अटक केली आहे. महिलेचा पती आणि अन्य एकजण फरार आहे. पैशांवरून हे हत्याकांड घडल्याचं सांगितलं जात होतं. पण या प्रकरणाला प्रेम प्रकरणाचीही किनार असल्याचे समजते.

    मुंब्रा येथील अमृतनगरमध्ये राहणारा २७ वर्षांचा अरबाज मकसूद अली खान डोंबिवलीमध्ये एका ठिकाणी साइड इंजिनीअर म्हणून काम करत होता. ३ एप्रिलला कामाचे पैसे घेण्यासाठी दादरला जात असल्याचे सांगून तो घरातून निघूल गेला. तो नंतर घरी न आल्याने मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. यानंतर एसीपी प्रिया डमाळे, वपोनि अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अंबादास सावंत यांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणात अरबाज याचे अंतिम लोकेशन वसईतील भोईदावाडा येथे आढळले. त्याच दिवशी त्याच्या ओळखीची महिला मेहजबीन हिचेही अंतिम लोकेशन वसईत आढळल्याने पोलिसांनी तिची चौकशी केली.

    मेहजबीन खातून इकरान शेख हिने तिचा पती हसन, भाऊ तारीक शेख आणि अन्य एकाच्या मदतीने पैसे मागण्याचे कारण पुढे करत अरबाजला वसईला बोलवून घेत त्याची हत्या केल्याचे तिने सांगितले. पूर्वनियोजित कट रचून अरबाज याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, पैसे नसल्याने त्याचे हातपाय बांधले, प्लास्टिकच्या पाइपने मारहाण करून त्याची हत्या केली. नंतर मृतदेह ड्रममध्ये भरून वसईतील निर्जन स्थळी गटारात फेकून दिल्याची बाब समोर आली.

    हत्येनंतर महिलेचा मृतदेह जाळला

    एकीकडे मुंब्र्यातील तरुणाच्या हत्येची घटना घडलेली असताना भिवंडीत एका विवाहित महिलेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटने एका संशयित आरोपीला जेरबंद केले आहे. द्वारिकाप्रसाद वर्मा उर्फ संजय मुकादम (४२) असे या आरोपीचे नाव आहे.

    ही घटना ११ मे रोजी घडली. मृत महिला प्रेमसंबंध ठेवत नाही तसेच ती फोनवर बोलत नाही, या कारणावरुन आरोपी वर्मा याने महिलेला त्याच्या घरी बोलवले. त्य दोघांचे भांडण झाले. रागाच्या भरात त्याने या महिलेची हत्या केली. त्यानंतर आरोपीने मृतदेह पोत्यात भरला. रात्री हा मृतदेह येथील मोकळ्या मैदानात नेऊन कच्च्या धाग्यांच्या वापर करीत जाळला.

    मृत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अखेर तांत्रिक विश्लेषणांआधारे आरोपी वर्मा याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा