Mumbai Shops Marathi Name Plates: देवनागरी लिपीमध्ये मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी दिला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने देवनागरी मराठीत ठळक अक्षरात नामफलक लावण्याचे निर्देश हॉटेले, दुकाने व अन्य आस्थापनांना दिले आहेत. तरीही आस्थापनांनी त्याकडे दुर्लक्षच केल्याने, शिवसेनेने नामफलक मराठीत करण्यासाठी एका महिन्याची मुदत दिली आहे.
कायदेशीर कारवाईचा इशारा
काही भागात इंग्रजीबरोबरच उर्दू भाषेतही नामफलक आहेत. त्यामुळे इंग्रजी, उर्दूसह कोणत्याही भाषेत नामफलक असल्यास ते मराठीत करावे, अन्यथा महापालिकेकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यानंतरही बदल न झाल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने धडा शिकवेल, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.MHADA Mumbai Lottery: मुंबईत म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; 610 घरांच्या किंमतीत 7.5 टक्के कपात, घाटकोपर, वांद्रे, दादरमध्ये हक्काचे घर मिळणार
बुधवारी विधी समितीची विशेष बैठक महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमहापौर संजय घाडी यांच्याबरोबरच विधी समिती अध्यक्ष दीक्षा कारकर, समितीचे सदस्य, महापालिकेचे उपायुक्त आणि दुकाने व आस्थापना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर उपमहापौर संजय घाडी आणि विधी समिती अध्यक्ष दीक्षा कारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठी नामफलकासंदर्भात माहिती दिली.
एका महिन्यात पाट्या बदला
‘देवनागरीत मराठी नामफलक नाहीत हा मुद्दा घेऊन बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे महापालिकेने नेमकी कशी कारवाई करावी, येणाऱ्या अडचणी इत्यादींवर चर्चा करण्यात आली. जे नामफलक मराठीत नाहीत, ते फलक एका महिन्यात मराठीत करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत,’ अशी माहिती विधी समिती अध्यक्ष दीक्षा कारकर यांनी दिली.
कुर्र्ल्यासह, क्रॉफर्ड मार्केटमध्येही काही नामफलक उर्दू भाषेत असून त्यावर फक्त उर्दू आणि इंग्रजीतच उल्लेख आहे. मराठी नामफलक नाही. त्यामुळे यासंदर्भातही कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे कारकर यांनी सांगितले.
उपमहापौर संजय घाडी यांनीही यावेळी निर्देश दिले. ज्या आस्थापनांना मराठी नामफलकासंदर्भात नोटीस दिल्या असतील त्यांनी काय उत्तर दिले, नेमकी काय कारवाई केली याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी घेण्यात येणार आहे. कारवाई तीव्र करा, असेही निर्देश देतानाच एका महिन्यानंतरही विविध आस्थापनांनी मराठी नामफलक करण्याकडे दुर्लक्ष केले, तर शिवसेना स्टाइलने त्यांना उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
NEET Paper Leak Case : पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘करिअर काऊन्सिलिंग’च्या नावे विद्यार्थ्यांचं सर्कल, टेलिग्रामवर विशिष्ट पासवर्ड; पेपरची छपाई कुठे झाली?
चालू महिन्यात विशेष मोहीम
नामफलकासंदर्भात चालू महिन्यात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. कारवाईसाठी मनुष्यबळ जरी कमी असले तरीही जास्तीत जास्त मनुष्यबळ घेऊन कठोर कारवाईही करणार असल्याचे विधी समिती अध्यक्ष दीक्षा कारकर यांनी स्पष्ट केले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा