• Fri. Jun 5th, 2026

    ‘स्वारगेट ते कात्रज’ भुयारी मेट्रोने प्रवास होणार! बोगद्याच्या ‘सेगमेंटचे कास्टिंग’ सुरू; कशी-कुठे असतील स्थानकं?

    ‘स्वारगेट ते कात्रज’ भुयारी मेट्रोने प्रवास होणार!  बोगद्याच्या ‘सेगमेंटचे कास्टिंग’ सुरू; कशी-कुठे असतील स्थानकं?

    Swargate to Katraj Metro: पीसीएमसी ते स्वारगेट मेट्रो लाइनचा विस्तार कात्रज पर्यंत होत असून या 5.46 किमी लांब भुयारी मार्गिकेचं काम सुरू झालं आहे. शिवाय पुणेकरांना मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: ‘स्वारगेट ते कात्रज या मार्गिकेच्या पहिल्या सेगमेंटचे कास्टिंग सुरू झाले आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुणेकरांनी ‘मेट्रो’चा अधिकाधिक वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधनबचतीच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा,’ असे आवाहन श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. ‘मेट्रोचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी ‘महामेट्रो’कडून स्वतंत्र प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांत मेट्रो प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

    कामाचे उद्घाटन झाले

    पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या ५.४६ किलोमीटर लांबीच्या भूमिगत विस्तारित मार्गिकेच्या कामाला सुरुवात झाली. यासाठीच्या पहिल्या ‘टीबीएम टनेल सेगमेंट’च्या कास्टिंग कामाचे उद्घाटन मंगळवारी झाले. ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ झाला. ‘महामेट्रो’चे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, विनोदकुमार अग्रवाल (प्रणाली व संचालन), हरेंद्र पांडे (वित्त) यांच्यासह अन्य अधिकारी व कंत्राटदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.Maharashtra TimesPune Metro: पुण्यात मेट्रोच्या ‘फेझ 2’मधील कामांना वेग! चार मेट्रो मार्गांची बांधणी; शहरात 30हून अधिक स्थानकं

    अत्याधुनिक ‘टीबीएम’द्वारे या मार्गिकेसाठीचा बोगदा खणला जाणार आहे. बोगद्याच्या मजबुतीकरणासाठी ‘प्रीकास्ट आरसीसी सेगमेंट’चा वापर केला जातो. या ९.७ किमी (दोन्ही बाजूंचे बोगदे मिळून) लांबीच्या मार्गासाठी एकूण सहा हजार ९९३ रिंग तयार केल्या जाणार आहेत. प्रत्येक रिंग ही ‘पाच अधिक एक’ (‘सेगमेंट’ अधिक ‘की सेगमेंट’) या रचनेत असेल. यासाठी आठ विशेष साचे वापरले जात आहेत. बोगद्याचा बाह्य व्यास ६.३५ मीटर असून, अंतर्गत व्यास ५.८ मीटर आहे. प्रत्येक सेगमेंटची जाडी २७५ मिलिमीटर असून, रिंगची रुंदी १.४ मीटर आहे. या मार्गावर मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बालाजीनगर, कात्रज अशी स्थानके आहेत.

    ‘मेट्रोचा वापर करा’

    ‘स्वारगेट ते कात्रज या मार्गिकेच्या पहिल्या सेगमेंटचे कास्टिंग सुरू झाले आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुणेकरांनी ‘मेट्रो’चा अधिकाधिक वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधनबचतीच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा,’ असे आवाहन श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. ‘मेट्रोचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी ‘महामेट्रो’ कडून स्वतंत्र प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांत मेट्रो प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

    पथदिव्यांच्या कामात त्रुटी

    सिंहगड रस्ता परिसरातील ४०हून अधिक नव्या पथदिव्यांची चोरी झाली आहे. जुन्या मीटरचे रीडिंग व नव्या फिटिंग्जनंतर होणारी वीजबचत याचा तुलनात्मक तक्ता सादर करण्यास ‘महाप्रीत’कडून टाळाटाळ केली जात आहे. ‘स्काडा’अहवालात अनेक त्रुटी आहेत, तर काही ठिकाणी केबलचे जॉइंट व जोडणीमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या विद्युत विभागाने ‘महाप्रीत’ला सर्व त्रुटींची पूर्तता केल्याशिवाय बिल देणार नसल्याचा इशाराही दिला आहे.

    Maharashtra TimesMumbai Metro: मुंबईत 100 किमी लांब मेट्रो नेटवर्क तयार! पुढे 16 नव्या मार्गांवर विकास होणार; ठाणे, नवी मुंबई, विरारपर्यंत विस्तार

    महापालिका हद्दीतील पथदिव्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या विद्युत विभागाने महात्मा फुले नूतनीकृत ऊर्जा व पायाभूत तंत्रज्ञान मर्यादित (महाप्रीत) या कंपनीला उर्वरित कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने सादर करण्याचा आदेश दिला आहे. यात महापालिकेच्या पाच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रस्तावित कामांच्या ‘डीपीआर’चा समावेश आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा