• Wed. Jun 17th, 2026

    खरेखुरे देवदूत! पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये टायमर जोडलेली बॉम्बसदृश्य वस्तू, डॉ गायकवाडांना रुग्णांची काळजी, स्वतः हाताने उचलून बॉक्स बाहेर नेला

    खरेखुरे देवदूत! पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये टायमर जोडलेली बॉम्बसदृश्य वस्तू, डॉ गायकवाडांना रुग्णांची काळजी, स्वतः हाताने उचलून बॉक्स बाहेर नेला

    Pune Hospital Bomb Found : हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचाऱ्याला बाथरूममध्ये संशयास्पद वस्तू दिसली. ती चमकत असल्याने तिने तातडीने ही गोष्ट सांगितली. जाऊन पाहणी केली असता, त्या वस्तूला चार कांड्या, टायमर आणि वायर जोडलेल्या होत्या

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : हडपसर येथील उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, संभाव्य धोका ओळखून हॉस्पिटलमधील रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन रुग्णालयाचे प्रमुख डॉ. विलास गायकवाड यांनी स्वतः ती वस्तू उचलून बाहेरील मोकळ्या जागेत नेल्याने अनर्थ टळला.

    इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अशी वस्तू कशी पोहोचली? सुरक्षा व्यवस्था नेमकी मजबूत आहे का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. काही जणांनी बिलाच्या वादातून किंवा वैयक्तिक रागातून हा प्रकार केला असावा, अशीही चर्चा रंगली आहे.

    डॉक्टरांनी स्वतः बॉम्ब उचलून नेला

    डॉ. विलास गायकवाड म्हणाले, ‘सायंकाळी सातच्या सुमारास हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचाऱ्याला बाथरूममध्ये संशयास्पद वस्तू दिसली. ती चमकत असल्याने कर्मचाऱ्याने तातडीने ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्या वस्तूला चार कांड्या, टायमर आणि वायर जोडलेल्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे ती बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचा संशय अधिक बळावला. हॉस्पिटलमध्ये रुग्ण असल्याने कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे तत्काळ ती वस्तू हाताने बॉक्समध्ये ठेवून रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेत नेऊन ठेवली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.’
    Maharashtra TimesSushma Andhare : खरातशी संबंध नाकारणाऱ्या चाकणकर तीन दिवस गुवाहाटीच्या हॉटेल ब्ल्यू रेडिसनमध्ये एकत्र होत्या, सुषमा अंधारेंचा आरोप
    दरम्यान, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाने तत्परतेने कारवाई करून संशयास्पद वस्तू सुरक्षितरीत्या नष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.

    मतीन पटेल यांना घर बांधून देणार, कारवाईवरून इम्तियाज जलीलांचा संताप

    संशयिताचा शोध सुरु

    उषा किरण हॉस्पिटल परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांकडून परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले जात असून, हॉस्पिटल परिसरात बॉक्स ठेवून संशयित तेथून निघून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.
    Maharashtra TimesNida Khan : गर्भवती असल्याने निदा खानला तातडीने जामीन मिळावा; अर्जावर कोर्टाचा मोठा निर्णय, नाशिकरोड कारागृहातील मुक्काम वाढला
    या घटनेमागे नेमका हेतू काय होता; तसेच संबंधित व्यक्ती एकटी होती, की तिच्यासोबत आणखी कोणी सहभागी होते, याचाही तपास सुरू आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि घाबरून न जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा