• Sun. Jun 14th, 2026
    NEET Paper Leak Case : पेपरफुटीमुळे NEET रद्द; प्रश्नपत्रिकेबाबत मोठी अपडेट, तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांना द्यावी लागणार फेरपरीक्षा

    Nashik NEET Paper Leak Case Shubham CBI Custody : वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा ‘यूजी नीट’च्या पेपरफुटी प्रकरणात सोळा संशयितांमध्ये नाशिक व अहिल्यानगरातील दोघांचा समावेश आहे. कुरिअरद्वारे प्रश्नपत्रिकांचा संच पुढे पाठविणाऱ्या संशयित शुभम मधुकर खैरनार (वय 27, रा. इंदिरानगर) याला नाशिक शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरा संशयित अहिल्यानगरातील धनंजय लोखंडे आहे.

    नाशिक नीट प्रश्नपत्रिका आधीच व्हायरल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    वृतसंस्था, नवी दिल्ली/नाशिक : पेपरफुटीच्या आरोपांनंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) नीट यूजी (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) ही परीक्षा रद्द केली आहे. ही परीक्षा 3 मे रोजी झाली होती. परीक्षेतील अनियमिततेची सर्वसमावेशक चौकशी करावी, असे निर्देश केंद्र सरकारने सीबीआयला दिले आहेत. देशभरातील 23 लाख विद्यार्थ्यांना आता नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे.

    23 लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली

    ‘परीक्षेच्या प्रक्रियेतील पारदर्शकता जपली जावी आणि या राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेवरील विश्वास कायम राहावा, या हेतूने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला’, असे एनटीएने एक्सवर पोस्ट करीत स्पष्ट केले. ‘याबाबत मिळालेल्या माहितीचे आम्ही केंद्रीय यंत्रणांच्या साथीने परीक्षण केले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती ठोस माहिती लागल्यानंतर केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर 3 मे रोजी झालेली ही परीक्षा रद्द करण्याचा आम्ही निर्णय घेतला. या परीक्षेच्या नव्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे अधिसूचना काढण्यात येईल’, असे एनटीएतर्फे सांगण्यात आले. देशभरातील 551 शहरांत, तसेच विदेशांतील 14 शहरांत ही परीक्षा झाली होती. देशभरात सुमारे 23 लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.
    Maharashtra TimesPaper Leak Shubham : 22 लाखांहून जास्त मुलांचं नुकसान, विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबेना; आरोपीचे वडील म्हणतात, आमचा मुलगा निर्दोष!

    वेगळे परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही

    ‘या पेपरफुटीची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू. या तपासासाठी आवश्यक सामग्री, नोंदी त्यांना पुरवण्यात येतील. विद्यार्थीहित डोळ्यांसमोर ठेवूनच ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना यासाठी नव्याने नोंदणी करावी लागणार नाही, तसेच वेगळे परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही’, असेही एनटीएने स्पष्ट केले.

    Maharashtra TimesNashik Paper Leak : कपडे बदलले, टक्कल केलं, तरीही पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं? NEET पेपरफुटी प्रकरणात नांदगावचा तरुण ताब्यात

    संभाव्य प्रश्नपत्रिका आधीच व्हायरल

    ‘सध्या या परीक्षेच्या संभाव्य प्रश्नपत्रिकेवर (गेस पेपर) तपास केंद्रित करण्यात आला आहे’, अशी माहिती राजस्थानचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विशाल बन्सल यांनी दिली. ‘ही संभाव्य प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष परीक्षेपूर्वीच म्हणजे, एक महिना ते 15 दिवस आधी पोहोचली होती, असे तपासात नोंदवण्यात आले आहे. या पेपरफुटीवरून अनेक चुकीच्या धारणा निर्माण झाल्या आहेत. या प्रश्नपत्रिकेत 410 प्रश्न होते व त्यातील सुमारे 120 प्रश्न रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये आले असा आरोप आहे’, असेही बन्सल म्हणाले. काही विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी केवळ 42 तास आधी हा गेस पेपर व्हॉट्सॲपवरून मिळाला, असेही सांगण्यात येते.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा