Weather Alert: नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात मंगळवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, पुढील दोन दिवसांत या क्षेत्राची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
monsoon(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
मयुरेश प्रभुणे, पुणे: देशाच्या विविध प्रदेशांत मान्सूनचे आगमन कधी होणार याचा स्थानिक पातळीवरील अंदाज वर्तवणारे मॉडेल (लोकल मान्सून ऑनसेट फोरकास्टिंग सिस्टीम-एलएमओएफएस) पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरोलॉजी’च्या (आयआयटीएम) पुढाकाराने विकसित करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश असलेल्या या मॉडेलच्या साह्याने यंदापासून १५ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील शेतकऱ्यांना त्यांच्या भागात मान्सून कधी दाखल होईल, हे एक महिना आधी समजू शकेल.
नवी दिल्लीतील कार्यक्रमात मान्सून आगमनाचा अंदाज वर्तवणाऱ्या आणि उत्तर प्रदेशमधील पावसाचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या मॉडेलचे मंगळवारी उद्घाटन झाले. या प्रसंगी केंद्रीय पृथ्वी विज्ञान सचिव डॉ. एम. रविचंद्रन, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा आणि ‘आयआयटीएम’चे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव उपस्थित होते.
मान्सून केरळमध्ये दाखल कधी होणार याच्या तारखेचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे साधारण दोन आठवडे आधी स्वतंत्रपणे दिला जातो. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर पावसाचे प्रमाण आणि नैर्ऋत्य मोसमी प्रवाहाची स्थिती पाहून देशाच्या इतर राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन कधी होणार हे काही दिवस आधी जाहीर केले जाते.
‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना डॉ. राव म्हणाले, ‘आयआयटीएमचा दोन आठवड्यांचा विस्तारित अंदाज, एआयवर आधारित अंदाज आणि शिकागो विद्यापीठाच्या सांख्यिकी मॉडेलच्या एकत्रीकरणातून ‘एलएमओएफएस’ विकसित केले आहे. ‘आयआयटीएम’मधील अर्क सुपर कम्प्युटरवर हे मॉडेल चालवले जाते. मान्सून आगमनाच्या काळात दर बुधवारी जाहीर होणाऱ्या या अंदाजातून पुढील चार आठवड्यांमध्ये ठरावीक भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता किती हे समजू शकेल. पहिल्या टप्प्यात मध्य भारतालगतच्या मान्सूनच्या मध्यवर्ती क्षेत्रातील ३१९६ मंडळांसाठी हा अंदाज देण्यात येईल.’
दरम्यान, बंगालच्या उपसागरावर मोसमी वाऱ्यांचा वाढता जोर आणि पावसाची शक्यता लक्षात घेता, येत्या चार ते पाच दिवसांत अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा