• Sat. Jun 6th, 2026
    सूर्य आग ओकणार! राज्यात उष्णतेच्या नव्या लाटेची शक्यता; दिवसाप्रमाणे रात्रीही उकाडा वाढणार

    Heatwave Alert: राज्यात मान्सूनचे आगमन लवकर होणार असे संकेत मिळत असतानाच उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला आहे. येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात नव्या उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: कोकण विभाग वगळता उर्वरित राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा अद्ययावत करण्यात आला. बुधवारपासून दमट वातावरणामुळे होणारा त्रास कमी होईल अशी शक्यता आहे. मात्र, कमाल तापमानाच्या पाऱ्यामध्ये चढउतार होत राहतील, अशीही शक्यता आहे.

    मंगळवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट नागरिकांना जाणवली. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे; तसेच नाशिक आणि पुण्याचा घाट परिसर येथे गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट नागरिकांना जाणवू शकते. यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड येथे बुधवार ते शुक्रवार, हिंगोली आणि नांदेड येथे गुरुवार आणि शुक्रवार या कालावधीत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती येथे बुधवारपासून, तर वर्धा येथे शुक्रवारी आणि शनिवारी उष्णतेची लाट जाणवू शकते.

    Maharashtra TimesMumbai News: ‘एल निनो’चं संकट असतानाच मुंबईत जलाशयात घट; महापालिकेचे मोठा निर्णय, 15 मेपासून संपूर्ण शहरात पाणीकपात

    अकोला येथे ४५.६, तर अमरावती येथे ४५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जळगाव येथेही कमाल तापमानाचा पारा ४५.५ अंशांपर्यंत पोहोचला होता. अहिल्यानगर, जेऊर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर येथेही कमाल तापमान ४० अंशांपलीकडे होते.

    दिवसाप्रमाणे रात्रीही उकाडा

    नाशिक परिसरात कमाल तापमानात वाढ झाली आहे. मालेगाव शहर व तालुक्यात उन्हाचा प्रकोप वाढतच असून, मंगळवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मनमाड शहर व परिसरात उन्हाच्या कडाक्याने शहरवासीय हैराण झाले असून, मंगळवारी या मोसमातील सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. एरव्ही गारठ्याच्या बातम्यांमध्ये सातत्याने गाजणारे निफाड यंदा तापमानाच्या आकडेवारीसाठी गाजत आहे. निफाडमध्ये यावर्षी उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी निफाड तालुक्यात ४३ अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका उष्णतेने होरपळून निघाल्याचा प्रत्यय आला.

    हवामानाचा आता स्थानिक अंदाज

    जागतिक हवामान बदलाच्या काळामध्ये एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणीही वेगवेगळे वातावरण अनुभवायला मिळते. मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी खूप पाऊस पडतो, त्याचवेळी दुसऱ्या ठिकाणी पावसाचा फारसा तडाखा बसत नाही, असेही आढळून आले आहे. त्यामुळे स्थानिक हवामानाचा अंदाज आवश्यक असतो. या पार्श्वभूमीवर, केंद्राच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि भारतीय हवामान विभागातर्फे ‘कृत्रीम प्रज्ञे’वर (एआय) आधारित दोन विशेष प्रणालींचे लोकार्पण करण्यात आले.

    Maharashtra TimesMumbai News: वाहनांनंतर सागरी किनारा मार्गावर हेलिकॉप्टरचे उड्डाण; वरळी जेट्टीवर उभारणार ‘हेलिपॅड’, कसा होणार फायदा?

    भारतीय हवामान विभागातर्फे हवामान पूर्वानुमानासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘एआय’वर आधारित असलेल्या या पहिल्याच प्रणाली आहेत. एका प्रणालीआधारे भारताच्या विविध भागांमध्ये मान्सून आगमनाचा अंदाज वर्तवण्यात येणार आहे, तर दुसरी प्रणाली उत्तर प्रदेशासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असून या माध्यमातून पावसाच्या अंदाजासंदर्भातील तपशीलवार माहिती मिळेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते या प्रणालींचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), पुणे आणि नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग यांनी या प्रणाली संयुक्तपणे विकसित केल्या आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा