• Sat. Jun 20th, 2026

    Nashik News : युरियाचा काळाबाजार डोळे पांढरे करणारा! औद्योगिक कारणांसाठीचा वापर उजेडात; सबसिडी शेतकऱ्यांना, वापर मात्र भलतीकडेच

    Nashik News : युरियाचा काळाबाजार डोळे पांढरे करणारा! औद्योगिक कारणांसाठीचा वापर उजेडात; सबसिडी शेतकऱ्यांना, वापर मात्र भलतीकडेच

    Urea Bag Subsidy : युरियाचा काळाबाजार होत असल्याचं उजेडात आला आहे. औद्योगिक कारणांसाठीच युरियाचा वापर होत असल्याचं समोर आलं आहे. युरियाची सबसिडी शेतकऱ्यांना मिळत आहे, पण वापर मात्र भलतीकडेच होत आहे.

    शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, नाशिक : शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात युरिया हे रासायनिक खत पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र दुसरीकडे युरियाचा काळाबाजार करून हा युरिया औद्योगिक वापरासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. इराण युद्धामुळे युरियाची आयात घटल्याने यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची युरियाची मागणी कशी पूर्ण करायची असा यक्षप्रश्न यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे. एकट्या नाशिक विभागाला खरीप हंगामासाठी 3 लाख 50 हजार मेट्रिक टन इतक्या युरिया खताची आवश्यकता असते. मात्र संपूर्ण राज्यासाठी मे महिन्यापर्यंत अवघा 1 लाख 87 हजार मेट्रिक टन इतकाच युरिया उपलब्ध होऊ शकला आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात युरियासाठी शेतकऱ्यांवर धावपळ करण्याची वेळ येणार आहे.

    रासायनिक खतांचा वापर करण्याचं आवाहन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचे नुकतेच आवाहन केले. होर्मुझमधील जागतिक तणावामुळे भारताला होणारा युरियासह इतर रासायनिक खतांचा पुरवठा ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन केले गेले आहे. युरियाचे अवघे 10 टक्के उत्पादन भारतात होते. उर्वरित युरियाची मागणी जॉर्डन, गल्फ, इस्त्रायल, मोरोक्को या देशांकडून भागवली जाते. ही सर्व वाहतूक होर्मुझमधूनच होते. आयात घटल्याने युरियाची टंचाई निश्चित मानली जात आहे.
    Maharashtra TimesNida Khan : महत्त्वाचे पुरावे एकत्र, पोलिसांनी कोर्टात धडाधड मुद्दे सांगितले, निदा खानची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात

    युरियाचा काळाबाजार डोळे पांढरे करणारा

    युरियाच्या 50 किलो गोणीची जागतिक किंमत 2300 रुपये इतकी आहे. किमत जास्त असल्याने शासन प्रती गोणी 2000 हजार रुपये इतकी सबसिडी शेतकऱ्यांना देते. म्हणून शेतकऱ्यांना 300 रुपयाला युरियाची एक गोणी मिळते. ही सबसिडी केवळ शेतकऱ्यांसाठीच आहे. दुसरीकडे इतर क्षेत्रातील वापरासाठी देखील हा सबसिडीचा युरिया विक्री चोरट्या मार्गाने सुरू असल्याची धक्कादायक बाब कृषी विभागाने खत विक्री केंद्रांच्या केलेल्या तपासणीत उघड झाली आहे. शेतकऱ्यांच्या नावे सबसिडी देऊन शेतकऱ्यांचा युरिया आपल्या घशात घालून त्याचा वापर औद्योगिक कारणासाठी सुरू असून, त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींचा देखील पाठिंबा असल्याची बाब उघड झाली आहे. राज्यभरात लाखो मेट्रिक टन युरियाच्या काळ्याबाजारातून कोट्यवधी रुपयांची वरकमाई केली जात असल्याचे वास्तव आहे.युरियाच्या 50 किलो गोणीची जागतिक किंमत 2300 रुपये

    शासनाकडून प्रती गोणी दोन हजार रुपये सबसिडी

    शेतकऱ्यांना युरियाची एक गोणी 300 रुपयांना
    Maharashtra TimesMaharashtra Weather: तापमानाने गाठला दहा वर्षांचा उच्चांक! पुन्हा पारा चाळिशीजवळ; तापमान वाढीचं नेमकं कारण काय?

    नाशिक विभागात 160 केंद्रांचे परवाने निलंबित

    नाशिक विभागात 8300 खत विक्री केंद्रे आहेत. त्यापैकी गेल्या दीड महिन्यात 2400 केंद्रांची तपासणी कृषी विभागाने केली असता, 160 केंद्रांतून हजारो मेट्रिक टन युरिया विक्रीचे संशयास्पद व्यवहार आढळले. या सर्व केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, अजून 58 केंद्रांच्या प्रकरणांचा तपास प्रलंबित आहे. या सर्व प्रकरणांत गेल्या दीड महिन्यांत 2,273 इतक्या शेतकऱ्यांनी 20 पेक्षा जास्त युरियाच्या गोण्या खरेदी केल्याचे आढळले. या शेतकऱ्यांची चौकशी केली असता, त्यांनी ही खरेदी केली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. मग विक्री केंद्रांतून हा युरिया नेमका कोणी खरेदी केला? कशासाठी खरेदी केला ? असे सवाल आता पुढे आले आहेत. सहा प्रकरणांत गुन्हेदेखील झाले आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा