Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे काल शनिवारी रात्री एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे.
धानोरा वडिलासंह दोन मुलांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमथील सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. विहिरीचं काम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा खचल्यानं, विहिरीत पडलेल्या दोन तरुण मुलांसह वडिलांचा जागीच मृत्यू झाला. काल शनिवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. बाजीराव सर्जेराव काकडे (वय 55), आजिनाथ बाजीराव काकडे (वय 25) आणि शाम बाजीराव काकडे (वय 22) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनं काकडे कुटुंब उद्ध्वस्त झालं असून संपूर्ण धानोरा गावावर शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, काकडे यांच्या शेतात नवीन विहिरीचं काम सुरू होतं. रात्रीच्या वेळी विहिरीत पाणी साचलं होतं. हे पाणी उपसण्यासाठी बाजीराव आपल्या दोन्ही तरुण मुलांसह विहिरीच्या काठावर उभे होते. मात्र, विहिरीच्या काठावर असलेली माती भुसभुशीत असल्यानं अचानक मोठा ढिगारा खाली खचला. विहीर खचल्यानं काठावर उभे असलेले तिघेही बाप-लेक विहिरीत कोसळले. त्यांच्या अंगावर मातीचा प्रचंड मोठा ढिगारा पडल्यानं त्यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. रात्रीची वेळ असल्यानं मदत कार्यातही अडचणी आल्या. स्थानिकांनी आणि नातेवाईकांनी तातडीने धाव घेऊन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानं तिघांचाही जागीच श्वास कोंडून मृत्यू झाला होता. Nagpur-Doha Flights: नागपूरवरून अमेरिका-यूरोप प्रवास सोपा! नागपूर-दोहा विमानसेवा पुन्हा सुरू होणार; पण वाढीव भाड्यामुळे खिशाला कात्री
घरचा आधार हरपला; सर्वत्र हळहळ
काकडे कुटुंब गावात मेहनती आणि मनमिळावू स्वभावासाठी ओळखले जात होते. आपली शेती फुलावी यासाठी ते दिवसरात्र विहिरीच्या कामात व्यस्त होते. दोन तरुण मुले आणि वडील अशा तिघांच्या एकाचवेळी झालेल्या निधनानं संपूर्ण गाव सुन्न झालं आहे. आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा आक्रोश पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. Weather Update: उन्हाचा तडाखा कमी होणार! अंदमानात यंदा मान्सूनआगमन लवकर; काय सांगतो ‘स्कायमेट’चा अंदाज?
घरचे धावताच आईला बघून पायाखालची जमीन सरकली
ज्या वयात बाळाला आईच्या मायेची सर्वात जास्त गरज असते, त्याच वयात एका नऊ महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे. खुलताबाद तालुक्यातील भडजी येथे एका 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पहाटेच्या शांततेत चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून घरचे धावत आले, तेव्हा समोर जे दृश्य होते त्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. आईचं पार्थिव छताला लटकत होता आणि खाली तिचे बाळ भुकेने व्याकुळ होऊन रडत होते.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा