• Fri. Jun 5th, 2026
    Pune Crime : ‘पैसे दे, नाहीतर सगळं घरी सांगते’; पुण्यात प्रेमाचं नातं बनलं जीवघेणं, कॅबचालकानं गर्लफ्रेंडला संपवलं, तरुणीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं

    Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील एका तरुणीच्या हत्येचं गूढ उलगडलं असून एक मोठी कहाणी समोर आली आहे.

    पुणे कॅबचालकाने गर्लफ्रेंडची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील केशवनगर कचरा डेपो परिसरात सापडलेल्या तरुणीच्या पार्थिवाचं रहस्य उलगडलं आणि त्यातून समोर आली आहे एक धक्कादायक लव्ह स्टोरी, प्रेम, अनैतिक संबंध, गर्भधारणा आणि पैशांच्या वादातून एका तरुणीची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. आफरीन पठाण (वय 29) असं या तरुणीचं नाव आहे.

    नेमकी घटना काय?

    ब्युटी पार्लरमध्ये काम करून स्वतःचं आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न करणारी ही आफरीन पठाण कामासाठी रोज कॅबने प्रवास करायची. तिची ओळख झाली कॅबचालक गोरखनाथ शिंदेशी. सुरुवातीला फक्त ओळथ मग मैत्री आणि नंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, हे नातं पुढे इतकं विकोपाला जाईल, याची कल्पना कुणालाच नव्हती. काही महिन्यांपूर्वी आफरीन गर्भवती राहिली. त्यानंतर तिने गर्भपातासाठी गोरखनाथकडे एक लाख रुपयांची मागणी केली. याच कारणावरून दोघांमध्ये सतत वाद सुरू झाले. आफरीनने ‘तुझ्या बायकोला आणि घरच्यांना सगळं सांगते’, अशी धमकी दिल्यानंतर गोरखनाथ अधिकच घाबरला होता.
    Maharashtra TimesNagpur News : नागपूरच्या शंकरनगर चौकात भर उन्हात ड्रामा, तरुण रस्त्यावर झोपला, बघणाऱ्यांच्या नजरा खिळल्या, सर्वच चक्रावले
    5 मे मंगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास गोरखनाथने आफरीनला भेटण्यासाठी बोलावलं. खराडी बायपासवरील रिलायन्स मॉलजवळ ती त्याच्या कॅबमध्ये बसली. गाडीत दोघांमध्ये पुन्हा पैशांवरून जोरदार वाद सुरू झाला. त्यानंतर गोरखनाथ तिला आव्हाळवाडीच्या दिशेने घेऊन गेला. त्याने निर्जन रस्त्यावर गाडी थांबवील. तिथे वाद विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात गोरखनाथने आफरीनचा गळा दाबला. काही क्षणातच तिचा जीव गेला. गाडीतच तिचं पार्थिव टाकून तो शांतपणे केशवनगरच्या दिशेने निघाला. कचरा डेपोजवळच्या अंधाऱ्या रस्त्यावर त्याने पार्थिव फेकून दिला आणि जणू काही घडलंच नाही अशा थाटात घरी परतला.
    Maharashtra TimesPune News : गाडी अंगावर आली अन् महिलेने ट्रॅकवर झोपून वाचवला जीव; पाटस रेल्वे स्थानकावरील थरार कॅमेऱ्यात कैद

    सीसीटीव्हीत संशयास्पद कॅब

    दुसऱ्या दिवशी परिसरात खळबळ उडाली. तरुणीचं पार्थिव सापडलं, पण घटनास्थळी एकही सीसीटीव्ही नव्हता. पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र, गुन्हे शाखा आणि मुंढवा पोलिसांनी हार मानली नाही. परिसरातील सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात एक संशयास्पद कॅब दिसली आणि तिथूनच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. अखेर चौकशीत गोरखनाथ शिंदे सर्व प्रकार सांगितलं आणि त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. प्रेमातून सुरू झालेलं नातं अखेर एका तरुणीच्या हत्येवर जाऊन संपलं. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरु असून या धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा