• Thu. Jun 18th, 2026
    Pune News : गाडी अंगावर आली अन् महिलेने ट्रॅकवर झोपून वाचवला जीव; पाटस रेल्वे स्थानकावरील थरार कॅमेऱ्यात कैद

    पुणे जिल्ह्यातील पाटस रेल्वे स्थानकावर आज अतिशय थरारक घटना घडली. एक महिला ही रेल्वे रुळ पास करत असताना अचानक मालगाडी आली. यावेळी महिलेला रेल्वे रुळ ओलांडता आला नाही. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी महिला थेट रेल्वे ट्रॅकवर खाली झोपली. ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुणे विभागातील पाटस रेल्वे स्थानक येथे पादचारी पुलाच्या अपुऱ्या सुविधेमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आज सकाळी स्थानकावर एक थरारक घटना घडली. रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक समोरून मालगाडी येऊ लागल्याने एका महिलेवर मृत्यूचा क्षण ओढावला. मात्र, प्रसंगावधान राखत त्या महिलेने थेट ट्रॅकवर झोपून स्वतःचा जीव वाचवला. हा संपूर्ण प्रकार स्थानकावरील कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटस स्थानकावर पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून २ वर जाण्यासाठी पादचारी पूल नव्हता. त्यामुळे प्रवाशांना मालगाड्यांच्या मधून किंवा थेट रुळ ओलांडून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. अनेक वर्षांच्या मागणीनंतर अखेर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म १ ते २ दरम्यान पादचारी पूल उभारला. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय कमी झाली.

    मात्र, प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या पुढे अजूनही दोन अतिरिक्त रेल्वे रुळ आहेत. या मार्गावरून मालगाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. धक्कादायक बाब म्हणजे या दोन रुळांवरून जाण्यासाठी अद्याप कोणतीही पादचारी पुलाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी, प्रवाशांना आजही थेट रुळ ओलांडूनच जावे लागत आहे.

    आज घडलेल्या घटनेत संबंधित महिला रुळ ओलांडत असतानाच अचानक मालगाडीला सिग्नल मिळाला आणि गाडी वेगाने पुढे सरकू लागली. गाडी अगदी जवळ आल्याचे लक्षात येताच महिलेने क्षणाचाही विलंब न करता ट्रॅकवर झोपण्याचा निर्णय घेतला. काही सेकंदांसाठी उपस्थित प्रवाशांचा श्वास रोखला गेला होता. मालगाडी पुढे गेल्यानंतर महिला सुखरूप बाहेर आली आणि मोठा अनर्थ टळला.

    या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. “वारंवार मागणी करूनही अतिरिक्त रुळांवर पूल बांधण्यात आलेला नाही. एखादा निष्पाप नागरिक जीव गमावल्यावरच प्रशासन जागं होणार का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पाटस स्थानकावरील अपुऱ्या सुविधांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    जीव बचावल्यानंतर महिलेची पहिली प्रतिक्रिया

    या घटनेनंतर संबंधित महिलेने प्रतिक्रिया दिली आहे. “पाटस रेल्वे स्टेशनपासून येताना ही घटना घडली होती. ती गाडी अचानक सुरु झाल्यामुळे मला रेल्वे रुळावर खाली झोपावं लागलं. माझ्यासोबत इतर जी दोन मुलं चालत होती ती पटकून उडी मारून अलिकडे आली. गाडी हलल्यामुळे मला पटपट चालता येत नव्हतं. प्रवास करताना अशी घटना घडते. नागरिकांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे तिथे पादचारी पूल व्हावा किंवा मालगाड्यांचा टाईमटेबल बदला”, अशी मागणी महिलेने केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा