• Tue. Sep 8th, 2026
महिलांनी आरोप करताच प्रांताधिकारी पळाला, संजय राऊतांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिकच्या मुंगसरा गाव परिसरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंग रोड बनविण्याच्या कामासाठी प्रशासनाकडून मोजणी सुरू होती. मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता प्रशासनाने पहाटेच्या सुमारास मोजणीला सुरुवात केली त्यानंतर पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने गावातील नागरिकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलीमात्र त्याच बाचाबाशी मध्ये काही गावातील नागरिकांना व महिलांना मारहाण करण्यात आली अशी तक्रार गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे आज संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले असता मुंगसरा गावातील शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी त्यांची भेट घेतली . गावकऱ्यांनी त्यांना सर्व प्रकार हा सांगितला त्यानंतर संजय राऊत, खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.गावकऱ्यांचा रोष शिगेला पोहचला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात संजय राऊत यांनी गावकऱ्यांसोबत आता ठिय्या मांडत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed