Solapur Triple Murder : भावजय आणि तिच्या दोन लेकरांची अतिशय निर्दयीपणे हत्या करणारा मुख्य आरोपी दीराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील तिहेरी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर ऊर्फ पप्पू मस्के याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. वहिनी आणि तिच्या दोन मुलांचा खून केल्यानंतर पाच दिवसांपासून पसार असलेल्या आरोपीचा घटनेच्या दिवसापासून पोलिस शोध घेत होते. गच्चीवर झोपलेल्या तिघांवर आरोपींनी मध्यरात्री तलवार घेऊन सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पसार झाले होते.
भावजय आणि तिच्या दोन लेकरांची अतिशय निर्दयीपणे हत्या करणारा मुख्य आरोपी दीराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने पश्चिम बंगालमधून त्याला जेरबंद केले. ट्रीपल मर्डर प्रकरणात एकूण सहा आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता, त्यामधील मुख्य आरोपी घटना घडल्यापासून फरार होता.
25 लाख परत करण्याचा तगादा
प्राथमिक माहितीनुसार भावजय गायत्री म्हस्के यांनी शंकर उर्फ पप्पू म्हस्के याला २५ लाख रुपये हातउसने दिले होते, ते परत करण्याचा तगादा गायत्री म्हस्के यांनी लावला होता. तसेच वडिलोपार्जित शेतजमिनीत वाटणी करावयाची आहे अशी मागणी गायत्री म्हस्के या नेहमी करत होत्या. त्यामुळे शंकर उर्फ पप्पू म्हस्के याने गायत्री म्हस्के, त्यांची मुलगी प्रिया सुधाकर म्हस्के आणि शिवराज सुधाकर म्हस्के अशी तिघांची तलवारीने घाव घालून हत्या केली होती. ट्रिपल मर्डरमुळे सोलापूरसह अख्खा महाराष्ट्र हादरला होता. सोलापूर तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एकूण सहा संशयितांना अटक केली आहे. Lady Police Commissioner : महिला पोलीस आयुक्तांची गुप्त मोहीम, मध्यरात्री 12.30 ला साध्या वेशात एकट्याच रस्त्यावर, 40 पुरुषांचा जवळीकीचा प्रयत्न
सहा संशयित आरोपींवर गुन्हा
दक्षिण सोलापूरतालुक्यातील बोरामणी गावात २ मे २०२६ च्या मध्यरात्री ही थरारक घटना घडली होती. गायत्री सुधाकर म्हस्के, प्रिया सुधाकर म्हस्के आणि शिवराज सुधाकर म्हस्के एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्येने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात होती. ग्रामीण पोलीस दलातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती.
Ambadas Danve | राज्याचे गृहमंत्री राजकारणात व्यस्त असल्यानं गुन्हेगार मोकाट, दानवेंचा टोला
तालुका पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. गायत्री म्हस्के यांचे भाऊ दिलीप विश्वनाथ चांदोरे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 351(2), 3(5) एकूण आरोपी 6 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शंकर उर्फ पप्पु दत्तात्रय म्हस्के,राणी शंकर म्हस्के , दिक्षा शंकर म्हस्के , धीरज शंकर म्हस्के ,सुरज माधवराज मोरे (रा. मस्के वस्ती बोरामणी ता. द. सोलापूर), सचिन शिवाजी वाघमारे (रा.बोरामणी ता.द.सोलापूर) अशी आरोपीची नावे आहेत. Salil Ankola : आईच्या निधनानंतर सावरणं कठीण; माजी क्रिकेटपटू सलील अंकोला पुण्यातील पुनर्वसन केंद्रात; पत्नी म्हणाली, पहिल्या प्रेमाकडे लवकरच परतेल
मुख्य आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक
ट्रिपल मर्डरमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विविध राज्यांत शोध मोहीम राबवली होती. दरम्यान या प्रकरणात यापूर्वी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. आता मुख्य आरोपी अटकेत आल्याने ग्रामीण पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा