Pune Crime : २०१५ पासून तो आमच्यापासून वेगळा राहतो, असं म्हणत आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्याची पत्नी व मुलाने केली. त्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही. त्याला कठोर शिक्षा दिल्यावर बॉडीही आमच्या ताब्यात देऊ नका, असंही भीमरावची पत्नी म्हणाली
ससून रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला आहे. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी ठेवण्यात आले आहेत. प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील तपासणीतूनच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
इन कॅमेरा शवविच्छेदन
नसरापूर येथे एक मे रोजी एका ६५ वर्षीय व्यक्तीने घरासमोर खेळणाऱ्या मुलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती. यानंतर ससून रुग्णालयात या मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. ससूनमधील न्यायवैद्यक विभागात शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया ‘इन कॅमेरा’ करण्यात आली होती. शवविच्छेदनादरम्यान घेतलेले अंतर्गत अवयवांचे नमुने तपासण्यासाठी प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदनावेळी प्रयोगशाळेच्या गुन्हे शाखेतील न्यायवैद्यक तज्ज्ञ उपस्थित होते. या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Mumbai Police Duty Hours : आठ तास ड्युटीचे ‘बारा’ वाजले! आता ’12 तास काम, 24 तास आराम’ संकल्पना आणा, पोलिसांची वाढती मागणी
ससून रुग्णालयात या प्रकरणातील आरोपीची सक्षमता तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा जलद गतीने तपास सुरू असल्याने सक्षमता तपासणीचा अहवाल तातडीने सादर करण्याची सूचना पोलिसांनी रुग्णालयाकडे केली आहे. त्यानुसार तातडीने अहवाल देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Abhijeet Bichukle | ‘छत्री धरणाऱ्या बाईला तुरुंगात टाका’; बिचुकले चाकणकरांवर भडकले
बायको म्हणते, संबंध नाही
आरोपी भीमराव कांबळे याला कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीच द्यावी, अशी मागणी त्याची पत्नी व मुलाने व्यक्त केली आहे. ‘गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा आमच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही,’ असे स्पष्ट करून पत्नी आणि मुलाने अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. पत्नीने संतप्त शब्दांत प्रतिक्रिया देताना सांगितले, ‘सन २०१५ पासून तो आमच्यापासून वेगळा राहतो. आम्ही कष्ट करून उदरनिर्वाह करतो. त्याने केलेले कृत्य घृणास्पद असून, त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. त्याला कठोर शिक्षा व्हावी. त्याचं शवदेखील आमच्या ताब्यात देऊ नये.’
Watermelon Deaths : ना पाणी, ना कलिंगड-बिर्याणी; अन्नावाटे विष शरीरात गेलं नाही, चौघांच्या शरीरात मॉर्फिन कसं शिरलं? डॉक्टरांचे थक्क करणारे सवाल
प्रशासनाकडे निवेदने
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनीही आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. राजगड विकास परिषद व राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर आणि सहकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देऊन आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली; तसेच भोर व राजगड परिसरातील विविध संस्था व संघटनांनी तहसीलदारांकडे निवेदने सादर करीत चिमुरडीला न्याय देण्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
