Pune Tunnel Network: पुण्याच्या वाहतूक कोंडीवर हे बोगदे प्रभावी पर्याय ठरू शकतात अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या बोगद्यांमुळे कोथरूड, सिंहगड रोड, गणेशखिंड रस्त्यावरील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रशांत आहेर, पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील वाढती वाहतूककोंडी फोडण्यासाठी दोन महत्त्वाकांक्षी बोगद्यांचा प्रकल्प तातडीने राबविण्याचा आदेश महापालिकेला दिला आहे. पुणे शहरातील पाषाण-कोथरूड आणि हिंगणे-धनकवडी या दोन मार्गांवर बोगद्यांच्या प्रकल्पांचा नारळ फोडण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पांमुळे प्रवासाचा कालावधी सरासरी ४० ते ६० मिनिटांवरून अवघ्या पाच ते १५ मिनिटांपर्यंत कमी होणार असल्याचा दावा केला जात आहे.
पाषाण ते कोथरूड आणि हिंगणे ते धनकवडी या दोन बोगद्यांमुळे गणेशखिंड रस्ता, कोथरूड, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड) आणि सहकारनगर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
Mumbai Underground Tunnel: गिरगाव चौपाटीपर्यंत बोगद्याचा विस्तार होणार! ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह’ भुयारी मार्गाचा नवा प्लॅन मंजूर; 5 मिनिटांत प्रवास
पुण्यात दर वर्षी तीन लाख नवीन वाहनांची भर पडते. सन २०२३-२४ अखेर शहरातील नोंदणीकृत वाहनसंख्या ७२ लाखांवर पोहोचली आहे. त्यातच महापालिका हद्द २४३.८४ चौरस किलोमीटरवरून ५१७ चौरस किलोमीटरपर्यंत वाढल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ताण प्रचंड वाढला आहे. परिणामी, पाषाण, कोथरूड, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, स्वारगेट, कात्रज यांसारख्या प्रमुख मार्गांवर दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील टेकड्यांमधून बोगदा तयार करून ‘कनेक्टिंग लिंक’ जोडण्याचा पर्याय विकसित करण्यात येत आहे.
पाषाण- कोथरूड बोगदा
सध्या पाषाणहून कोथरूडला जाण्यासाठी चांदणी चौक किंवा सेनापती बापट रस्ता हेच दोन प्रमुख पर्याय आहेत. या दोन्ही मार्गांवर आठ ते नऊ चौक ओलांडावे लागतात. त्यामुळे १० ते ११ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ४० ते ६० मिनिटे लागतात. प्रस्तावित पाषाण- पंचवटी- कोथरूड बोगदा तीन किलोमीटरचा असेल. पंचवटी टेकडीखालून जाणाऱ्या या बोगद्यातून पाषाण रस्ता, पंचवटी रस्ता आणि पौड रस्ता यांना थेट जोडले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पाषाण-कोथरूड प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
टेकड्यांखालून थेट पुणे
टेकड्यांखालून रस्ते काढण्याचा आराखडा कागदावर आकर्षक दिसत असला, तरी तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासनाप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कस लागणार आहे.
असा असेल बोगदा
९३० मीटरचा चार-लेन (२+२) बोगदा आणि उर्वरित अॅप्रोच रोड असतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हिंगणे ते धनकवडी प्रवास केवळ पाच ते १० मिनिटांत शक्य होईल. सिंहगड रस्ता, स्वारगेट, कात्रज, बिबवेवाडी आणि सातारा रस्ता या प्रमुख मार्गावरील ताण कमी होऊन वाहतूक अधिक सुरळीत होण्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
हिंगणे (सिंहगड रस्ता) ते धनकवडी (सातारा रस्ता) या मार्गावरील थेट संपर्काला तळजाई टेकडीचा मोठा अडसर आहे. त्यामुळे सध्या स्वारगेट किंवा कात्रजमार्गे वळसा घालून प्रवास करावा लागतो. हे ७.५ ते नऊ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी नऊ ते १० चौक आणि ४० ते ५० मिनिटांचा वेळ खर्ची पडतो. यावर उपाय म्हणून हिंगणे- तळजाई – धनकवडी बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. हा बोगदा एकूण २.४ किलोमीटर लांबीचा असेल.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा