Census In Maharashtra: जनगणनेसाठी प्रत्येक कुटुंबाशी सविस्तर बोलावे लागत असल्याने प्रत्येक घरी जास्त वेळ थांबावे लागणार आहे. अशावेळी केवळ एका शिक्षिकेने तेथे जाणे हे धोकादायक असल्याची भावना शिक्षिकांनी व्यक्त केली आहे.
सध्या प्रशासनाच्यावतीने जनगणनेची मोहीम राबविण्यात येते आहे. त्यासाठी, शासकीय आणि खासगी शाळांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळांमध्ये शिक्षिकांचे प्रमाण मोठे असते आणि त्यांना घरोघरी जाऊन ही जनगणना करावयाची आहे. मात्र, त्यासाठी प्रशासनाने प्रत्येक शिक्षिकेला एकेकटे घरोघरी जाऊन तेथील माहिती संकलित करण्यास सांगितले आहे.
Sindhudurg Crime : शाळेत झेंडावंदन केलं, पण घरी परतलीच नाही; कोकणातील शिक्षिका बेपत्ता, फोन लागेना, आठ वर्षांचा लेक व्याकूळ
शहरातील अनेक भाग हे संवेदनशील आहेत. कित्येक अनोळखी आणि दूरवरच्या भागांमध्ये शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथे एकट्याने जाणे हे कोणत्याही महिलेसाठी असुरक्षित आहे. विशेषत: सध्याच्या वातावरणात या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून महिलांमध्ये भीती आहे. प्रशासनाने जनगणनेसाठी नियुक्ती करताना एका वस्तीत दोन महिलांचा गट अशा प्रकारे नियुक्ती करायला हवी, असे मत शिक्षिकांनी व्यक्त केले आहे.
Chandrapur Crime: नवऱ्याची किंमत 1 लाख; चंद्रपुरात पत्नीकडून स्वत:चंच कुंकू पुसण्याची सुपारी, शाळेच्या परिसरात आढळली बॉडी
जनगणनेसाठी सध्या शिक्षकांची प्रशिक्षणे सुरू आहेत. महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शिक्षिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली. दोन-दोनच्या गटाने महिलांना जनगणनेसाठी पाठवावे, अशीही विनंती केली. मात्र, प्रशासनाने असा कोणताही तोडगा काढण्याचीही तसदी घेतलेली नाही. ‘तुम्ही तुमच्या नवऱ्याला, घरच्यांना किंवा कुणालातरी घेऊन हे काम पूर्ण करा’, असे सल्ले या अधिकाऱ्यांनी दिले. एक-दोन दिवस कुणी सोबत येईल, पण महिनाभर चालणाऱ्या कामासाठी कुटुंबीय कसे काय येऊ शकतील, असा प्रश्न शिक्षिकांनी विचारला आहे. जिल्हा प्रशासनाने महिला शिक्षिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर व्यावहारिक विचार करून निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
