• Sat. Sep 5th, 2026

आमदार नारायण कुचेंच्या लेकीच्या लग्नाला राजकीय नेत्यांची उपस्थिती, मुख्यमंत्र्यांकडून खास शुभेच्छा

आमदार नारायण कुचेंच्या लेकीच्या लग्नाला राजकीय नेत्यांची  उपस्थिती, मुख्यमंत्र्यांकडून खास शुभेच्छा

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एक भव्य आणि शाही विवाह सोहळा पार पडला. बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या मुलीचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.डॉ. सायली कुचे आणि शशांक निंभोरे यांनी लग्नबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली.या सोहळ्याची खास बाब म्हणजे राज्यातील आणि देशातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संजय शिरसाट, पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि अतुल सावे यांच्यासह अनेक मंत्री,आमदार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली.भव्य सजावट, शाही व्यवस्था आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे हा विवाह सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वधू वरास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed