Aaple Sarkar Portal Closed: प्रतिज्ञापत्रे न मिळाल्यास विद्यार्थी शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती आणि अन्य सवलतींपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सर्व्हर क्षमता वाढवून आणि तांत्रिक त्रुटी दूर करून पोर्टल युद्धपातळीवर पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.
महा-ई-सेवा केंद्रांचे पोर्टल लॉगिन होत नसल्याने पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. परिणामी उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास, नॉन-क्रिमिलेअर , ईडब्ल्यूएससह विविध दाखल्यांची ऑनलाइन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो अर्ज प्रलंबित आहेत.
Buldhana Accident: मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, 2 मजुरांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर
दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला. आता बारावीचा निकालदेखील जाहीर झाला आहे. शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने विद्यार्थी व पालकांची गैरसोय होत आहे. विशेषतः दैनंदिन कामकाजासाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. बँकिंग, न्यायालयीन, मालमत्ता, शैक्षणिक तसेच इतर अनेक कामांसाठी आवश्यक असलेली प्रतिज्ञापत्रे आपले सरकार पोर्टलची सेवा बंद असल्यामुळे मिळणे कठीण झाली आहे. पोर्टल बंद असल्याने आम्ही कोणतीही प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही, असे उत्तर नागरिकांना ऐकावे लागते.
Latur Crime : पुण्यानंतर लातूरमध्ये संतापजनक प्रकार, जन्मदात्या बापाकडूनच गतीमंद अल्पवयीन लेकीवर अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती
डिजिटल सेवांप्रति नाराजी
राज्य शासनाने डिजिटल सेवांचा मोठा गाजावाजा केला. ऑनलाइन सुविधा देण्याबाबत जनतेला आश्वस्त केले. मात्र, मुख्य पोर्टलच अचानक बंद पडले. ते आजपर्यंत सुरू झाले नाही. सेवा केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढत असली तरी त्यांना योग्य सेवा मिळत नसल्याने नाराजी वाढली आहे.
