• Mon. Jun 15th, 2026
    Kishori Pednekar यांची महापौरांच्या खुर्चीकडे धाव; रितू तावडेंच्या अनुपस्थितीत सभागृहात गोंधळ, काय घडलं नेमकं?

    Kishori Pednekar vs Ritu Tawde: विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौरांच्या खुर्चीवर जाऊन बसण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

    किशोरी पेडणेकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : महापालिका सभागृहात महापौर उशिरा आल्याने आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अनुपस्थित असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौरांच्या खुर्चीवर जाऊन बसण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकारामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

    सोमवारी दुपारी दोन वाजता सभा होणार होती. मात्र, सुमारे पावणेतीन वाजेपर्यंत महापौर रितू तावडे आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक उपस्थित नव्हते. दरम्यान, विरोधी पक्षातील शिवसेना उबाठा , काँग्रेस आणि मनसेचे नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. कोरम पूर्ण असल्याचा दावा करत पेडणेकर यांनी महापौरांच्या खुर्चीत बसून कामकाज सुरू करण्याची भूमिका घेतली.

    Devendra Fadnavis | अद्भूत विजय ! रसगुल्ला खाऊन तोंड गोड केलं, मोदींचं कौतुक ममतादीदींवर निशाणा

    या वेळी काही नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. महापालिका सचिवालयातील अधिकाऱ्यांनी नियमांची माहिती देत समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र काही वेळ त्या भूमिकेवर ठाम राहिल्या. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे सभागृहात आल्यानंतर त्यांनीही नियमांनुसार तसे करता येणार नसल्याचे सांगितले. यानंतर महापौर आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक सभागृहात दाखल झाल्यानंतर पेडणेकर या आपल्या आसनावर परतल्याने परिस्थिती निवळली.

    पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या निमित्ताने भाजपच्या नगरसेवकांनी सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयात जल्लोष केला. या विजयानिमित्त मुंबई महापालिका सभागृहात भाजपने अभिनंदनाचा ठराव मांडला. तर सभागृहात पेढे वाटले. मात्र या अभिनंदनाच्या ठरावावर सभागृहात बोलताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपला नसरापूरच्या घटनेची आठवण करून दिली.
    Maharashtra TimesMaharashtra AI Policy: सरकारी विभागांना ‘एआय’ प्रकल्प बंधनकारक; गतिमान, पारदर्शक कारभारासाठी राज्य सरकारचा निर्णय
    परंपरेचा मुद्दा उपस्थित
    सभागृह उशिरा सुरू होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप करत पेडणेकर यांनी परंपरेचा मुद्दा उपस्थित केला. महापौर आणि उपमहापौर अनुपस्थित असल्यास माजी महापौरांना पीठासीन अधिकारी म्हणून बसवण्याची पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले. काही दिवसांपूर्वी स्थायी समिती अध्यक्षांना महापौरांच्या खुर्चीत बसवण्यात आल्याचा उल्लेख करत, त्याच पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधी पक्षाचे नगरसेवक वेळेवर उपस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा