Orange-Gate to Marine Drive Tunnel: प्रस्तावित भुयारी मार्गामुळ मरीन ड्राइव्ह परिसरातील वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता असल्यामुळे या बोगद्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई: मुंबई पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगद्याचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने 19 एप्रिल रोजीच या विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार हा बोगदा आता इस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतू यांना कोस्टल रोडशी जोडणार आहे. या नव्या विस्तारामुळे मुंबईतील भुयारी मार्गांचं जाळं अजून मजबूत होणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
कसा होणार विस्तार?
यापूर्वी ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी बोगदा मराठा भवनपर्यंतच बांधला जाणार होता. पण आता त्याचा गिरगाव चौपाटीपर्यंत विस्तार होणार आहे. या चौपाटीजवळ पीएन हिंदू स्विमिंग बाथ अँड बोट क्लबपर्यंत वाढवला जाणार आहे. यापूर्वीच्या प्रस्तावाला 2024मध्येच मंजुरी मिळाली होती पण नव्या आराखड्यासाठी एप्रिल महिन्यात MCZMA कडून मंजुरी मागवण्यात आली होती.Santacruz-Chembur Link Roadचा अंतिम टप्पा पूर्ण होणार! पश्चिम-पूर्व द्रुतगती महामार्ग सिग्नल-मुक्त प्रवास कधीपासून शक्य?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीनुसार बोगद्याला आणखी उत्तरेपर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. क्विन्स नेकलेसच्या आजूबाजूच्या मार्गांवरील वाहतूक कोंडी फुटणार आहे. यामुळे पर्यटकांची पसंती असलेल्या या ठिकाणावर पोहोचणं सोपं होणार आहे. हा बोगदा पूर्ण होताच, मुंबईच्या पूर्वेकडील ऑरेंज गेट परिसराला पश्चिमेकडील गिरगाव चौपाटीपर्यंत जोडणार आङे. सध्या या माप्रनवासासाठी तब्बल 45 मिनिटांचा कालावधी लागत असून हे अंतर अवग्या 5-10 मिनिटांत पार होणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील महत्त्वाच्या मार्गांना जोडणी मिळणार असून एस.व्ही. पटेल मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारणार आहे.
जुन्या मार्गामध्ये का बदल केले?
जुन्या आराखड्यानुसार उजव्या बाजूने हा बोगदा 3.547 किमी लांब असणार होता आणि डावीकडून 5.687 किमी लांब असणार होता. पण त्यानंतर डिझाइनमध्ये सुधारणा करण्यात आली. सुधारित डिझाइननुसार उजवीकडून हा मार्ग 4.6 किमी लां तर डाबीकडून 4.9 किमी लांब असेल. या संपूर्ण प्रकल्पामध्ये दोन भुयारी बोगद्यांचा समावेश आहे. इस्टर्न फ्रीवेवरून हे दोन्ही बोगदे सुरू होतात. एका बोगद्याचा एक्झिट मुंबई कोस्टल रोडजवरील सैफी रुग्णालयाजवळ बनवला जाणार आहे.
Mumbai Metro 6: 110 कामगार, 110 टनचे तीन गर्डर, एका रात्रीत पश्चिम रेल्वेर उभारले; मुंबई मेट्रो 6चा महत्त्वाचा टप्पा पूर्ण
पहिल्या आराखड्यानुसार बोगद्याचा एक्झिट मरिन ड्राइव्हजवळ ठरवला होता. पण मरीन ड्राइव्हसारख्या वर्दळीच्या ठिकाणी वाहनं मोठ्या संख्येने बोगद्यातून बाहेर पडू लागली तर त्या मार्गावरील वाहतूक कोंडी वाढली असती. सध्याच्या मार्गांवर भार वाढला असता. त्यामुळे मरीन ड्राइव्हपर्यंत संपणाऱ्या मार्गाला दोन फाटे फोडून, नरिमन पॉईंटच्या दिशेने एक चार पदरी मार्ग आणि पी.डी. मेलो रोड आणि एमबीटी पार्किंगच्या दिशेने आणखी एक चार पदरी मार्गाची योजना तयार करण्यात आली. याच प्रस्तावाला आता मंजुरी मिळाली आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा