अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीर गोष्टींच्या विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. यावेळी तुकाराम मुंढे यांचा मोर्चा थेट Misbranded सौंदर्य प्रसाधनांच्या दिशेला वळला आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बेकायदेशीर औषधांच्या कारवाई पाठोपाठ आता Misbranded सौंदर्य प्रसाधनांवरही कारवाईला सुरुवात झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील कराड येथे छापा टाकत तब्बल 29.45 लाखांचा साठा जप्त केला आहे. तसेच मुंबईत 3.96 लाखांची विनापरवाना सौंदर्यप्रसाधने, कच्चा माल व उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. मुंबई आणि सातारा या दोन्ही ठिकाणी एकूण 34.61 लाखांच्या किमतीच्या सौंदर्य प्रसाधने साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी राज्यातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत नियमानुसार तपशील नसलेली (Misbranded) सौंदर्यप्रसाधने तसेच भ्रामक दावे व विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 12 जून 2026 रोजी मे. राजलक्ष्मी टेलीकम्युनिकेशन, कराड, जिल्हा सातारा येथे तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विविध सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी साठविलेली आढळून आली.
सदर उत्पादनांची पडताळणी केली असता अनेक उत्पादनांच्या बाह्य कार्टनवर बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक नमूद असताना आतील बाटल्यांवरील लेबलवर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक तसेच उत्पादकाचे नाव नमूद नसल्याचे निदर्शनास आले. काही उत्पादनांवर उत्पादन परवाना क्रमांक नमूद असला तरी उत्पादकाची माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे संबंधित सौंदर्यप्रसाधने प्रथमदर्शनी भ्रामक (Misbranded Cosmetics) असल्याचे आढळून आले. या प्रकरणी सुमारे 29,45,375/- किमतीचा साठा प्रतिबंधित करण्यात आला असून पुढील तपास पूर्ण करून कायदेशीर कारवाई नियोजित आहे.
मुंबईतही मोठी कारवाई, कोणकोणते उत्पादने जप्त?
13 जून 2026 रोजी मुंबई येथील M/S Beauty Centre, Crawford Market येथे करण्यात आलेल्या तपासणीत काही सौंदर्य प्रसाधने उत्पादनांवर आवश्यक वैधानिक तपशीलांचा अभाव असल्याचे आढळून आले. यामध्ये Daily Devine Aromatherapy Essential Oil Blend Natural Breast Enlarge, Daily Divine Aromatherapy Essential Oil Blend Natural Butt Enhancement, Daily Divine Aromatherapy Essential Oil Blend Natural Intense Fat Burner, Flaura Essential Heritage Blend Berry Rich, Flaura Essential Heritage Blend Healing Touch आणि Flaura Essential Heritage Blend Pure Glow या उत्पादनांचा समावेश आहे. सदर उत्पादनांवर बॅच क्रमांक, परवाना क्रमांक तसेच उत्पादकाची माहिती अपुरी असल्याने व भ्रामक दावे असल्याने रुपये 1,20, 152/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
मुंबईत आणखी एक कारवाई
मुंबईतील आणखी एका कारवाईमध्ये प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 13 जून 2026 रोजी कांदिवली (पश्चिम), मुंबई येथील M/S Radiant Creations या संस्थेची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आवश्यक वैध परवान्याविना औषधे व सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन व विक्रीसाठी साठा ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तसेच उत्पादन प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री व कच्चा मालही तेथे उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणात औषधे, सौंदर्यप्रसाधने, कच्चा माल तसेच उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री असा एकूण रु. 3,96,830/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, 1940 आणि त्याअंतर्गत नियमांनुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांची प्रतिक्रिया काय?
“जनतेच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना अन्न व औषध प्रशासन शून्य सहनशीलतेच्या (Zero Tolerance) धोरणाने सामोरे जात आहे. भ्रामक, निकृष्ट दर्जाची अथवा विनापरवाना उत्पादने तयार करणे, साठवणे किंवा विक्री करणे याविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहील. ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि सुरक्षित उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करणे हेच प्रशासनाचे प्रमुख ध्येय आहे”, अशी प्रतिक्रिया अन्न-औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा