• Sun. Jun 14th, 2026

    MHADA Pune Lottery 2026: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; कधीपर्यंत?

    MHADA Pune Lottery 2026: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; कधीपर्यंत?

    MHADA Housing Lottery: मुंबईपाठोपाठ पुण्यातही म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 4 मे पासून सुरू ही प्रक्रिय सुरू होणार आहे. पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला.

    म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (म्हाडा) प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर पुणे, पिंपरी-चिंचवड; तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रातील शिल्लक घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे १३ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

    मुदतवढीमागचं कारण काय?

    प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर पुणे, पिंपरी-चिंचवड; तसेच ‘पीएमआरडीए’ क्षेत्रातील २० टक्के सर्वसमावेशक योजना; तसेच १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेंतर्गत विक्रीअभावी शिल्लक राहिलेल्या ‘म्हाडा’च्या सदनिकांची जाहिरात २३ एप्रिलला देण्यात आली होती. या सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया चार मेपासून सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली होती; परंतु ‘आपले सरकार’ वेबपोर्टलमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे डोमिसाइल प्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखला काढण्यास अडचणी येत आहेत. त्या कारणामुळे अर्जदारास अर्जासाठी चार मेपासून १३ मेपर्यंतचा कालावधी मिळणार आहे.Maharashtra TimesMumbai-Pune Expressway’s Missing Link: प्रवाशांना ‘कनेक्टिंग लिंक’ची भुरळ! घाटातला रस्ता ओस; मुंबई-पुणे प्रवास सुस्साट

    अर्ज करण्यासाठी आज, चार मे रोजी सकाळी ११.३०पासून १३ मेपर्यंत अर्ज वितरणाची प्रक्रिया http://bookmyhome. mhada.gov.in या ‘म्हाडा’च्या वेबसाइटवर सुरू आहे, असे ‘म्हाडा’च्या प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

    म्हाडाच्या मते, अर्जदारांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांमुळे ही मुदतवाढ आवश्यक होती. आपले सरकार पोर्टलमध्ये अनेक तांत्रित अडथळे येत होते. अधिवास आणि उत्पन्नाचे दाखले मिळवण्यातही नागरिकांना वेळ लागत होता. त्यासह कागदपत्रांच्या पडताळणीसाठी होणार विलंब आणि ऑनलाइन सबमिशन दरम्यान सिस्टिममध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे ही मुदतवाढ करण्यात आली आहे.

    मुंबईतही 14 मेपर्यंत मुदतवाढ

    दरम्यान, पुण्यासह मुंबईतही म्हाडाच्या अर्जाची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. ही तारीख आता 14 मेपर्यंत करण्यात आली असून 5 जून रोडी सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईमधील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. मार्च 2026 मध्ये, म्हाडाने मुंबई रिअल इस्टेट मार्केटमध्ये 2,640 परवडणाऱ्या घरांची लॉटरी जाहीर केली. म्हाडाच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 1,762 इमरातींचं म्हणजेच सुमारे 66% बांधकाम सुरू आहेत.

    Maharashtra TimesPune Metro: पुण्यात मेट्रोच्या ‘फेझ 2’मधील कामांना वेग! चार मेट्रो मार्गांची बांधणी; शहरात 30हून अधिक स्थानकं

    म्हाडाने दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील उच्च उत्पन्न गटातील घरांची यादी जाहीर केली. या घराची किंमत तब्बल 6.82 कोटी रुपये आहे. म्हाडाच्या दिलेल्या माहितीनुसार, मुंबई बोर्डाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार 14 मे 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. अर्जदार 15 मे 2026 रोजी रात्री 11:59 पर्यंत अर्नेस्ट मनी डिपॉझिट (EMD) ऑनलाइन भरू शकतात, तर RTGS / NEFT देयके त्याच दिवशी बँकिंग तासांपर्यंत स्वीकारली जातील.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा