• Sat. Jun 6th, 2026
    दादा गेले, पण वहिनींना भरभरुन मतदान; बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना भरभक्कम आघाडी, पहिल्या फेरीतच विजयी वाटचाल

    Baramati By-Election Results 2026 Updates : अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूतीची लाट, तसेच बारामतीतील पारंपरिक राजकीय वर्चस्व या पार्श्वभूमीवर ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, बारामती : उपमुख्यमंत्रिपदावर असताना अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली. अजित दादांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहेत. सुनेत्रा पवारांसमोर कुठल्याही ताकदवान उमेदवाराचं आव्हान नसल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीअखेर सुनेत्रा पवार 6500 मतांनी, दुसऱ्या फेरीअखेर 16543 मतांनी आघाडीवर आहेत.

    पारंपरिक राजकीय वर्चस्व

    बारामतीच्या पोटनिवडणुकीला भावनिक आणि राजकीय अशा दोन्ही अंगांनी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूतीची लाट, तसेच बारामतीतील पारंपरिक राजकीय वर्चस्व या पार्श्वभूमीवर ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. बारामतीमध्ये राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीसाठी ३०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

    जय पवारांची भेट

    निवडणुकीपूर्वी जय पवार यांनी बारामतीत भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आले होते. मतदानाच्या दिवशी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
    Maharashtra TimesPune Nasrapur Case : वीज गेली, सीसीटीव्ही बंद पडले, पण मंदिरासमोरील घरात बॅटरीवरचा CCTV ठरला दुवा; भोरच्या विकृताला 20 वर्षांपूर्वीच झालेली गावबंदी

    विक्रमी मतदानाची शक्यता

    विक्रमी मतदानाची शक्यता वर्तवली जात असून, ग्रामीण भागासह शहरी मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केले. त्यामुळे निकालात मोठे राजकीय संकेत मिळण्याची शक्यता आहे.

    दुसऱ्या फेरीअखेर मते

    सुनेत्रा पवार : 16543
    अभिजीत बिचुकले : 15
    करुणा मुंडे : 18
    चंद्रकांत वाघमोडे : 5
    नोटा : 48
    एकूण मोजून झाले : 16843

    Sushma Andhare | गृहमंत्र्यांना प्रश्न म्हणजे राजकारण करणं, अंधारेंनी फडणवीसांना धारेवर धरलं

    प्रशासनाकडून मतमोजणी प्रक्रियेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक फेरीचे निकाल जाहीर होत असताना कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बारामतीच्या या पोटनिवडणुकीचा निकाल केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्याच्या राजकारणावरही परिणाम करणारा ठरणार आहे.
    Maharashtra TimesThalapathy Vijay : अभिनेत्री त्रिशा बर्थडेसाठी तिरुपतीला; चाहते म्हणाले, विजयच्या ‘विजया’साठी मंदिरात, ‘थलपती’ची पिछाडीने सुरुवात

    राहुरीत अक्षय कर्डिले मैदानात

    राज्यात बारामतीसोबत अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचीही मतमोजणी आज, सोमवारी होत आहे. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राहुरीत पोटनिवडणूक झाली. भाजपकडून उमेदवारी मिळालेले शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला आहे. राहुरीत मतमोजणीमध्ये २७ फेऱ्या होणार आहेत. दुपारपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याचा अंदाज आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा