• Sat. Jun 13th, 2026

    Jellyfish Warning Alibaug : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये समुद्रकिनाऱ्यावर जाताय तर सावधान! निळाशार ‘ब्लू बटन’चा सापळा, अलिबागमध्ये पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

    Jellyfish Warning Alibaug : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये समुद्रकिनाऱ्यावर जाताय तर सावधान! निळाशार ‘ब्लू बटन’चा सापळा, अलिबागमध्ये पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

    Alibaug Beach Blue Button Jellyfish : अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारा निळ्या रंगाचा ‘ब्लू बटन’ जेलीफिश सध्या दिसून येत आहे. आकर्षक दिसणारा हा सागरी जीव प्रत्यक्षात धोकादायक ठरू शकतो. पर्यटकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर अलीकडे निळ्या रंगाचा आकर्षक दिसणारा ‘ब्लू बटन’ जेलीफिश आढळून आल्याने पर्यटकांमध्ये कुतूहलासोबतच चिंता व्यक्त केली जात आहे. वाळूत सापडणारा हा नाजूक आणि सुंदर दिसणारा सागरी जीव प्रत्यक्षात धोकादायक ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. अलिबागच्या पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी या मोहक जीवाच्या सौंदर्यावर भाळून न जाता स्वतःच्या आरोग्याची आणि सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

    नेमका प्रकार काय?

    समुद्राच्या लाटांसोबत किनाऱ्यावर येणारा ‘ब्लू बटन’ ( Porpita porpita) हा जेलीफिशसारखा दिसणारा जीव असून त्याच्या निळ्या रंगाच्या कडा आणि मध्यभागी असलेली गोलाकार रचना पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. अनेक जण उत्सुकतेपोटी त्याला हात लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्याच्या स्पर्शामुळे त्वचेवर जळजळ, खाज, लालसरपणा किंवा सौम्य चटके बसू शकतात. काही संवेदनशील व्यक्तींमध्ये ही प्रतिक्रिया अधिक तीव्रही होऊ शकते.

    “सागरी जीवांपासून दूर राहावे”

    विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि पर्यटकांनी अशा अज्ञात सागरी जीवांपासून दूर राहावे, असे आवाहन स्थानिक प्रशासन आणि पर्यावरणप्रेमींनी केले आहे. काही वेळा हे जीव मोठ्या संख्येने किनाऱ्यावर वाहून येतात, ज्यामुळे धोका अधिक वाढतो. त्यामुळे किनाऱ्यावर फिरताना सतर्कता बाळगणे अत्यावश्यक ठरते.

    मोहून जाऊ नका, पण आनंद घ्या

    निसर्गाचे हे मोहक रूप डोळ्यांना भुरळ घालत असले, तरी त्यामागील संभाव्य धोका लक्षात घेऊनच पर्यटकांनी वावरावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. सुरक्षिततेला प्राधान्य देत समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

    समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात वस्तूंना हात लावणे टाळा

    दरम्यान, अलिबाग किनाऱ्यावर सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढत असताना अशा घटनांमुळे सुरक्षेच्या दृष्टीने अधिक खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना सूचना देण्यास सुरुवात केली असून, समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात वस्तू किंवा जीवांना स्पर्श न करण्याचे आवाहन केले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा