• Wed. Jun 17th, 2026

    पीडितेला न्याय मिळवून देण्यास सरकार कटिबद्ध – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 3, 2026
    पीडितेला न्याय मिळवून देण्यास सरकार कटिबद्ध – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर – महासंवाद

    मुंबई, दि. ३ : नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असून या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. पीडित बालिकेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपीला कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी दिली.

    या प्रकरणातील न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याबाबत तसेच खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. पीडित बालिकेच्या कुटुंबियांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    ०००

    राजू धोत्रे/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed