• Mon. Jun 15th, 2026

    Mumbai-Pune Missing Link : मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर सेल्फी अन् फोटो काढण्यास मज्जाव, अन्यथा महागात पडणार; पोलिसांकडून मोठी कारवाई

    Mumbai-Pune Missing Link : मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर सेल्फी अन् फोटो काढण्यास मज्जाव, अन्यथा महागात पडणार; पोलिसांकडून मोठी कारवाई

    Mumbai Pune Expressway Missing Link : मिसिंग लिंकवर वाहनं 100 ते 120 किमी प्रतितास वेगाने धावत असतात. अशा परिस्थितीत मध्येच थांबून फोटो काढणं हे अत्यंत धोकादायक ठरत आहे.

    मुंबई पुणे मिसिंग लिंक फोटो सेल्फी बंंधी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पाचेंद्रकुमार टेंभरे, मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकच्या ( मिसिंग लिंक ) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहनचालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असx आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

    सेल्फी, फोटो काढण्यासाठी थांबू नका…

    1 मे महाराष्ट्र दिनी रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे मार्गावरील कनेक्टिंग लिंक अर्थात ‘मिसिंग लिंक’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले. महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे. तसेच बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी 100 किमी वेग मर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी 80 किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे 24×7 सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असून द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती महामार्ग पोलिसांना दिली जाणार आहे. सेल्फी, फोटो आणि रिल काढण्यासाठी थांबू नका नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते. तसेच तुमच्यासह इतरांच्याही वाहनांना धोका होऊ शकतो. या कारणास्तव, नियमांचे पालन करा आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
    Maharashtra TimesRaigad Accident : साखरपुड्यासाठी निघाले, आनंद गगणात मावत नव्हता, पण कर्नाळा खिंडीत टेम्पो ट्रॅव्हलर पलटी, आनंदावर विरजण

    खोपोलीहून कुसगावला जोडतो ‘मिसिंग लिंक’

    ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प मुंबईच्या बाजूकडील खोपोलीला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील कुसगावला जोडतो. यामुळे द्रुतगती मार्ग पूर्णपणे प्रवेश नियंत्रित होईल आणि घाटावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

    सहा हजार 700 कोटींचा खर्च

    महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) सहा हजार 700 कोटी खर्च करून विकसित केलेल्या या प्रकल्पात दोन बोगदे, दोन पूल आणि टायगर व्हॅलीवरील एका केबल-स्टेड पुलाचा समावेश आहे. यामुळे तीव्र उतार असलेल्या आणि अपघातप्रवण खंडाळा किंवा भोर घाट भागाला वळसा घालून एक नवीन मार्ग उपलब्ध झाला आहे, जिथे विशेषतः शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये अनेकदा वाहतूक कोंडी होते.
    Maharashtra TimesFDA Raid : नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये मोठी कारवाई, आंबे पिकवण्यासाठी केमिकलचा वापर?

    सहा किलोमीटर अंतर कमी

    ‘हा प्रकल्प 19.16 किलोमीटर लांबीच्या आधुनिक कॉरिडॉरचा एक भाग आहे’, असे एम.एस.आर.डी.सी.ने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘या ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर सुमारे सहा किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ 20 ते 30 मिनिटांनी कमी होईल’.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा