• Sun. Jun 7th, 2026

    Rohit Pawar : महाराष्ट्रात दर तासाला महिलांवर अत्याचार, खळबळजनक आकडेवारी दाखवत रोहित पवारांची फडणवीस सरकारकडे मोठी मागणी

    Rohit Pawar : महाराष्ट्रात दर तासाला महिलांवर अत्याचार, खळबळजनक आकडेवारी दाखवत रोहित पवारांची फडणवीस सरकारकडे मोठी मागणी

    Rohit Pawar Nasrapur visit : पुण्यातल्या भोरमधील नरसापूर प्रकरणाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आज राष्ट्रवादी शपचे आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणातील पीडित कुटुंबाची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि तिच्या हत्येच्या निर्घृण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी आज आमदार रोहित पवार नसरापूर येथे पोहोचले होते. कुटुंबाचे सांत्वन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेर भाष्य केले. राज्यात दर तासाला एका महिलेवर अत्याचार होतोय आणि गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात दिवसाला २४ अत्याचार घडत असून दरवर्षी ५० हजार महिलांवर अत्याचार होत असल्याची भीषण आकडेवारी त्यांनी माध्यमांसमोर मांडली. बीड, बदलापूर आणि बारामतीमधील अलीकडच्या घटनांचा दाखला देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

    ” शक्ती कायदा लागू करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा”

    नसरापूरच्या घटनेतील आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा नराधम यापूर्वीही दोनदा अशाच प्रकारच्या गुन्ह्यात पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. मात्र दोन्ही वेळेस तो जामिनावर बाहेर आला. दोन गुन्हे करूनही तिसरी घटना करण्याचे धाडस त्याच्यात येतेच कसे असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. हा नराधम पुन्हा बाहेर येणार असेल तर या कायद्याचा उपयोग काय अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आणलेला ‘शक्ती कायदा’ सध्या केंद्राकडून परत आला आहे. सरकारने आता तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे आणि हा कायदा लागू करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी पवारांनी केली आहे.

    तपास जलदगतीने व्हावा

    रोहित पवार यांनी यावेळी सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. या प्रकरणाचा तपास जलदगतीने करून १५ दिवसांत चार्जशीट दाखल करावी आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. पीडित मुलीच्या आईला सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि कुटुंबातील एका महिलेला शासकीय नोकरी देण्यात यावी असेही त्यांनी नमूद केले.

    नुसत्या घोषणा न करता सरकारने आता ठोस कृती करण्याची वेळ आली असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. राजकारण बाजूला ठेवून महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ‘शक्ती’ दाखवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा