• Sun. Jun 14th, 2026
    Pune Crime : पुण्यातील भोरनंतर म्हाळुंगेमध्ये मोठी घटना, अनैसर्गिक अत्याचार करुन चिमुकल्याला संपवलं; बॅगमध्ये बॉडी आढळली

    Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एका चिमुकल्याची हत्या करुन पार्थिव बॅगमध्ये आढळलं आहे.

    पुणे म्हाळुंगे मुलाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : पुण्यातील पिंपरी-चिंचवडच्या दक्षिण म्हाळुंगे परिसरातून एक अत्यंत मोठी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निरागस चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची निर्दयी हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

    बॅगमध्ये पार्थिव आढळलं

    काल शुक्रवारी रोजी दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित चिमुकला घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला, मात्र मुलगा सापडला नाही. शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर संबंधित मुलगा शेजारील एका खोलीत बॅगमध्ये मृतावस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासात बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झालं.
    Maharashtra TimesSolapur Crime : पतीच्या निधनानंतर लेकरांसोबत जगत होती, संपत्तीच्या वादातून दिराचं भयानक कृत्य; गाढ झोपेत असलेल्या आईसह दोन लेकरांना संपवलं

    आरोपी हा अल्पवयीन

    याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 238 तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास वेगानं सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तपासात समोर आलं की, संशयित आरोपी हा बिहार राज्यातील रहिवासी असून तो अल्पवयीन आहे. आरोपी गुन्हा करून बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेरील परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

    आरोपीची कबुली

    विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्याला कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना समाजमनाला हादरवणारी असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी समाजानं अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
    Maharashtra TimesRohit Pawar : महाराष्ट्रात दर तासाला महिलांवर अत्याचार, खळबळजनक आकडेवारी दाखवत रोहित पवारांची फडणवीस सरकारकडे मोठी मागणी

    नसरापूर घटनेवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

    भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या प्रकरणातील नराधमाला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली, तरी जनमानसातील संताप शांत झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला खडेबोल सुनावले असून, ‘आम्हाला आश्वासन नको, ॲक्शन पाहिजे,’ अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा