• Sun. Jun 7th, 2026

    Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! मध्य, पश्चिम रेल्वेवर शनिवारी ब्लॉक; 10 तास चालणार दुरुस्तीकामे, कोणत्या लोकल रद्द? पाहा वेळापत्रक

    Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! मध्य, पश्चिम रेल्वेवर शनिवारी ब्लॉक; 10 तास चालणार दुरुस्तीकामे, कोणत्या लोकल रद्द? पाहा वेळापत्रक

    Mumbai Local Mega Block On 2 May 2026: या ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामे केली जाणार आहेत.

    मुंबई लोकल मेगाब्लॉक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राष्ट्रीय स्तरावरील नीट-यूजी परीक्षेमुळे या रविवारी रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले असले, तरी पश्चिम व मध्य रेल्वेने शनिवार-रविवार या दरम्यान रात्रकालीन दीर्घ ब्लॉकचे नियोजन केले आहे.

    पश्चिम रेल्वेे
    स्थानक – राम मंदिर व जोगेश्वरी दरम्यान
    मार्ग – पाचवी व सहावी मार्गिका
    वेळ – शनिवारी रात्री ९.३० ते रविवारी सकाळी ७.३० वाजेपर्यंत
    परिणाम – सहाव्या मार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या बोरिवली ते अंधेरी या दरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील. काही उपनगरीय रेल्वे गाड्यांची सेवा रद्द असेल.

    बच्चू कडू, नीलम गोऱ्हे ते शीतल म्हात्रे; अयोध्या पौळ यांचे एकनाथ शिंदेंना चिमटे

    मध्य रेल्वे मुख्य मार्ग
    स्थानक – सीएसएमटी ते विद्याविहार
    मार्ग – अप आणि डाऊन स्लो
    वेळ – शनिवारी मध्यरात्री १२.०५ ते रविवारी सकाळी ५.०५
    परिणाम – या दरम्यान सुटणाऱ्या सर्व उपनगरीय गाड्या या स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून चालवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला या स्थानकांवरच थांबतील.

    Maharashtra TimesVidhan Parishad : झिशान सिद्दीकींच्या उमेदवारीसाठी बॉलिवूड सुपरस्टारचा फोन, राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा, कार्यकर्ते नाराज
    ट्रान्स हार्बर
    स्थानक – ठाणे ते नेरूळ-वाशी
    मार्ग – अप आणि डाऊन
    वेळ – शनिवारी रात्री ११.४५ पासून रविवारी पहाटे ४.४५ वाजेपर्यंत
    परिणाम – ब्लॉकदरम्यान या मार्गावरील सर्व वाहतूक बंद राहील.

    हार्बरच्या गारेगार प्रवासात बदल
    हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये १ मेपासून बदल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोड, वाशी आणि पनवेल स्थानकांदरम्यान धावणाऱ्या एसी गाड्यांच्या वेळेत महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. ज्या गाड्यांच्या क्रमांकासमोर ‘X’ असे चिन्ह देण्यात आले आहे, त्या गाड्या रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी धावणार नाहीत. या दिवशी चालणाऱ्या सर्व एसी लोकलच्या फेऱ्या या साध्या गाड्या असतील.

    सकाळी वडाळा रोडवरून पहिली एसी लोकल ५:०६ वाजता सुटून ६:०८ वाजता पनवेलला पोहोचेल. सीएसएमटीहून सकाळी ७:१७, ७:४०, १०:१० आणि १०:३४ वाजता पनवेलसाठी गाड्या असतील. दुपारी १:०७ वाजता सीएसएमटीवरून सुटणारी गाडी वाशीपर्यंत धावेल. संध्याकाळी ३:३६, ६:३३ आणि ८:०० वाजता पनवेलसाठी मुख्य फेऱ्या असून, रात्रीची शेवटची एसी लोकल मध्यरात्री १२:२४ वाजता सुटून ०१:१३ वाजता वाशीला पोहोचेल.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा