• Fri. Jun 5th, 2026
    संतोष देशमुखांनी तेव्हा 9 मतांनी पाडलेलं; स्वरुपानंदांनी पराभवाचा वचपा काढला, सहानुभूतीची लाट थोपवत 92 मतांनी विजय कसा मिळवला?

    Massajog Sarpanch Election :​ दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला, यावरुन मस्साजोग गावातील सहानुभूतीची लाट ओसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यामधील मस्साजोग ग्रामपंचायतीतील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा विजय झाला आहे, तर दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे मस्साजोग गावातील सहानुभूतीची लाट ओसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

    मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली होती. यामध्ये अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरुपानंद देशमुख यांच्यात थेट लढत झाली होती. एक भावनिक वातावरण या निवडणुकीत पाहायला मिळालं, मात्र मतदारांनी अखेर स्वरुपानंद देशमुख यांना पसंती दिल्याचं समोर आलं आहे. 92 मतांनी त्यांनी विजयाचा गुलाल उधळला.

    पराभवाचा वचपा काढला

    संतोष देशमुख यांच्याविरोधात स्वरुपानंद देशमुख यांनी 2022 मध्ये सरपंच पदाची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत संतोष देशमुख यांना स्वरुपानंद देशमुख यांनी कांटे की टक्कर देत लढत दिली होती, मात्र अवघ्या 9 मतांनी स्वरूपानंद यांना पराभव पत्करावा लागला होता. संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली आणि स्वरुपानंद यांना राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली.
    Maharashtra TimesSharad Pawar : तरुण नेतृत्वाला एकत्र बसवलं, पवारांचे महत्त्वाचे संदेश? मोदीबागेत कौटुंबिक डिनरमागील राजकीय खेळीची चर्चा

    18 महिन्यांच्या कालावधीसाठी पोटनिवडणूक

    सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदावर 18 महिन्यांच्या कालावधीसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत बिनविरोध ग्रामपंचायत येणार असल्याचा विश्वास त्यांचे बंधू धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता.
    Maharashtra TimesGayatri Devi : साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ, औंधच्या राणी गायत्रीदेवी भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीचा हात सोडणार

    रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; गुणरत्न सदावर्ते यांनी प्रताप सरनाईकांना डिवचलं

    सहानुभूतीची लाट ओसरली

    भावनिक साद घालत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांना सरपंच म्हणून निवडून देण्यात यावे, असा गावकऱ्यांनी निर्णय घेतला, मात्र दुसऱ्या बाजूला गावातील स्वरुपानंद देशमुख यांनी भावनेपेक्षा कामाला गावातील जनता कौल देणार आणि यंदा माझा विजय निश्चित आहे, असं म्हणत गुलाल लागणार असल्याचं सांगितलं होतं. मस्साजोग गावच्या नागरिकांनी अश्विनी संतोष देशमुख यांच्या विरोधात स्वरुपानंद देशमुख यांनाच प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा